शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election 2019 : 'आमचे सरकार आल्यास 600 युनिटपर्यंत मोफत वीज देणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 07:47 IST

Delhi Vidhan Sabha Election 2019 : 'छोट्या उद्योगांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत'

नवी दिल्ली : झारखंडनंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने अद्याप दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली नाही. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. यांनतर काँग्रेसनेही दिल्लीवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. 

दिल्लीतील वजीरपूर परिसरात काँग्रेसने बुधवारी जनसभा आयोजित केली. यावेळी दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, "अरविंद केजरीवाल सरकारकडून दिल्लीवासीयांना फक्त 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळत आहे. मात्र, दिल्लीत आमचे सरकार आल्यानंतर 600 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येईल. तसेच, छोट्या उद्योगांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. याचा उल्लेख पक्षाच्या जाहिरनाम्यात करण्यात येणार आहे."  

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आतापर्यंत जेवढी विकास कामे झाली नाही. तेवढी विकास कामे गेल्या पाच वर्षात दिल्लीत आम आदमी पार्टीच्या सरकारने केली आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.  

दुसरीकडे, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे. केजरीवाल सरकारने 509 शाळा आणि 20 नवीन महाविद्यालये सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, असे काहीच केले नाही. याशिवाय, दिल्लीतील रुग्णालयांमध्ये आयसीयू, बेड आणि व्हेंटिलेटर यांसारख्या आवश्यक सुविधा सुद्धा नाही. एवढेच नाही तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: जलबोर्डाचे चेअरमन आहेत. तरी सुद्धा दिल्लीतील जनतेला दूषित पाणी प्यावे लागले, असे भाजपाचे दिल्लीतील अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसBJPभाजपा