शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जेईई मुख्य परीक्षेला पहिल्या दिवशी ६0 टक्के विद्यार्थी उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 06:43 IST

या परीक्षेसाठी ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १२ पाळ्यांत ६६0 केंद्रांतून सहा दिवस ही परीक्षा होणार आहे.

दिल्ली - अनेक शंका-कुशंका आणि विरोधानंतरही अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) परीक्षांना मंगळवारी प्रारंभ झाला. ६0 टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी सहभागी झाले होते. या परीक्षेसाठी ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १२ पाळ्यांत ६६0 केंद्रांतून सहा दिवस ही परीक्षा होणार आहे.परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी  सांगितले की परीक्षेच्या वेळी शारीरिक अंतर आणि कोरोना बचावासाठी केवळ मास्कच नव्हे तर सॅनिटायझरही उपलब्ध करण्यात आले होते. एनटीएचे महाव्यवस्थापक डॉ. विनीत जोशी यांनी देशभरात सर्वत्र परीक्षा शांततेत पार पडल्याचे सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयल निशंक म्हणाले की विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये ही सरकारची इच्छा होती. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव यांच्या सहकार्याने हे शक्य झाले. त्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सोयही करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महाव्यवस्थापक डॉ. जोशी म्हणाले ६ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत एक लाख १२ हजार विद्यार्थी बसणार आहेत. पहिल्या पाळीत वापरलेले कॉम्प्युटर दुसºया वेळी वापरण्यात आले नाहीत. त्याशिवाय परीक्षा केंद्राबाहेर पडतानाही सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची काळजी घेण्यात आली होती.जेईई परीक्षा देशात सर्वत्र अगदी सुरळीत पार पडल्या. त्यासाठी राज्य सरकारे, अधिकारी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांचे सहकार्य लाभले.-अमित खरे, उच्च शिक्षण सचिव

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रIndiaभारत