शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 06:52 IST

काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली चार तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

आदेश रावल -

नवी दिल्ली : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्यूला अंतिम टप्प्यात असतानाच काँग्रेसने दिल्लीत झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत ६० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. ८४ नावांवर चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. 

काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली चार तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीत चर्चेदरम्यान ३० जागांवर एकच नाव, तर २० जागांवर दोन नावे पुढे आली होती. १५ जागा वादग्रस्त होत्या. चर्चेअंती ६० मतदारसंघांसाठी उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

पुढे काय? : उर्वरित जागांसाठी १८ तारखेला पुन्हा बैठक होणार आहे. त्यानंतर २० तारखेला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सर्व नावांची चर्चा होईल. त्यानंतर काँग्रेसची पहिली यादी येईल, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमतमुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी ३३ जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यामध्ये उद्धवसेनेच्या वाट्याला काँग्रेस आणि शरद पवार गटापेक्षा जास्त जागा येतील. उर्वरित ३ जागांचा तिढा २ ते ३ दिवसांमध्ये सोडविला जाईल आणि महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जानकरांनी सोडली महायुती, रासप लढणार स्वबळावर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली.     - सविस्तर/५

बसपही महाराष्ट्रात सर्व जागा लढणार बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मायावतींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवेल.  

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्रNana Patoleनाना पटोले