शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात 5 जणांनीही गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:05 IST

6 people of a family died due to electrocution : विजेचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. विजेचा शॉक (Electric Shock) लागल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छतरपूर जिल्ह्यातील महुआ झाला परिसरात हृदयद्रावक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील एक तरुण पाण्याचा टँक सुरू करण्यासाठी पाण्याच्या मोठ्या टाकीत उतरला होता. याच दरम्यान विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. 

पाण्याच्या टाकीमध्ये अंधार असल्याने विजेची व्यवस्था करण्यात आली आणि याचमुळे तरुणाला शॉक लागला. विजेचा शॉक लागलेल्या तरुण जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून घरातील दुसरे सदस्यदेखील टाकीजवळ आले. त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. तरुणाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या सात जणांना विजेचा शॉक लागला असून यातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळ पसरली आहे. लक्ष्मण अहिरवार यांचा मुलगा रमुआ (55), शंकर अहिरवार यांचा मुलगा हल्ली अहिरवार (35), मिलन अहिरवार यांचा मुलगा हल्लू (25), नरेंद्र यांचे वडील जगन अहिरवार (20), रामप्रसाद यांचा मुलगा हल्ली अहिरवार (30), विजय यांचा मुलगा जगन अहिरवार (20) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! पॉर्न साईटवर अपलोड केला पोलिसाच्या मुलीचा फोटो अन् नंबर; नेत्याच्या मुलावर गंभीर आरोप

पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुलाने पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे फोटो मॉर्फ करून पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले आहेत. इतकंच नाही तर त्याने मुलीचा फोन नंबरही या साईटवर अपलोड केला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी आणि आरोपी यांची आधीपासूनच ओळख होती. मुलीच्या कुटुंबीयांनी जून महिन्यातच बिधाननगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी शनिवारी आयटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूelectricityवीज