शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

लॉकडाऊनमध्ये ६० लाख कर्मचारी झाले बेरोजगार, सीएमआयईचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 12:36 AM

‘सीएमआयई’ने केलेल्या ‘कंझ्युमर पिरॅमिड हाउस होल्ड सर्व्हे’मध्ये म्हटले आहे की, २०१६ पासून पांढरपेशा रोजगारांत वाढ होत होती.

नवी दिल्ली : कोविड-१९ला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मे आणि आॅगस्ट यादरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ६० लाख पांढरपेशे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. इंजिनिअर, फिजिशियन, अकाउंटंट, विश्लेषक आणि शिक्षक यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.‘सीएमआयई’ने म्हटले की, सरकारने जूनमध्येच अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू केली असली तरी, सातत्याचे निर्बंध आणि स्थानिक पातळीवरील लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत अडथळे येत आहेत. रोजगाराच्या मार्गातही असेच अडथळे निर्माण झालेआहेत.‘सीएमआयई’ने केलेल्या ‘कंझ्युमर पिरॅमिड हाउस होल्ड सर्व्हे’मध्ये म्हटले आहे की, २०१६ पासून पांढरपेशा रोजगारांत वाढ होत होती.जानेवारी ते एप्रिल २०१६ या काळातील लाटेत १२.५ दशलक्ष पांढरपेशे कर्मचारी भरले गेले होते. मे-आॅगस्ट २०१९ या काळात त्यांची संख्या सर्वोच्च पातळीवर १८.८ दशलक्ष होती. सप्टेंबर-डिसेंबर २०१९ या काळात १९.७ दशलक्षासह ती स्थिर होती. जानेवारी-एप्रिल २०२० या काळात ती घटून १८.१ दशलक्षावर आली. या काळात लॉकडाऊनचा अंशत: परिणाम दिसून आला.मे-आॅगस्ट २०२० या काळात मात्र पांढरपेशा कर्मचाऱ्यांचीसंख्या घटून १२.२ दशलक्षांवर आली. २०१६ नंतरचा हा नीचांकीआकडा आहे. मागील चार वर्षांत पांढरपेशा रोजगार क्षेत्रात जी वाढ झाली होती, ती मे-आॅगस्ट२०२० या काळात लॉकडाऊनमुळे वाहून गेली.मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी ‘सीएमआयई’च्या वेबसाइटवर लिहिले की, मे-आॅगस्ट २०२० या काळात ५.९ दशलक्ष पांढरपेशा कर्मचाऱ्यांना आपले रोजगार गमवावे लागले. मे-आॅगस्ट २०१९च्या आकड्यांशी तुलना केल्यास बेरोजगारीचा हा आकडा ६.६ दशलक्षांवर जातो.पांढरपेशांचा रोजगार नीचांकीमे-आॅगस्ट २०२० या काळात मात्र पांढरपेशा कर्मचाºयांची संख्या घटून १२.२ दशलक्षांवर आली. २०१६ नंतरचा हा नीचांकी आकडा आहे. मागील चार वर्षांत पांढरपेशा रोजगार क्षेत्रात जी वाढ झाली होती, ती मे-आॅगस्ट २०२० या काळात लॉकडाऊनमुळे वाहून गेली.

टॅग्स :Employeeकर्मचारीcorona virusकोरोना वायरस बातम्या