धक्कादायक! नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 21:09 IST2025-05-01T21:01:58+5:302025-05-01T21:09:31+5:30

6 Members Of A Family Drown In River: गुजरातमध्ये उन्हाळ्याची सुट्टी साजरी करण्यासाठी मामाच्या घरी गेलेल्या सहा मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

6 Members Of A Family Drown In River In Gujarat's Kheda | धक्कादायक! नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू

गुजरात येथील कनिज गावात नदीत बुडून ६ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील मुले अहमदाबादहून त्यांच्या मामाच्या घरी सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. बुधवारी संध्याकाळी मेश्वो नदीत आंघोळीसाठी गेली असताना ते पाण्यात बुडाले. स्थानिकांनी या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अपयशी ठरले. एकाच कुटुंबातील सहा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

दिव्या रामजीभाई सोलंकी,भूमिका भूपेंद्रभाई जादव, जिनल पंकजभाई सोलंकी, ध्रुव पंकजभाई सोलंकी, फाल्गुनी आणि मयूर असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या लोकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण त्यांच्या मामाच्या घरी सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. बुधवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही मुले अंघोळीसाठी मेश्वो नदीत गेली. नदीत उतरल्यानंतर ते पाण्यात बुडाले. तिथे उपस्थित असलेल्या तीन जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अपयशी ठरले. 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आमदार अर्जुन सिंह चौहान, जिल्हाधिकारी अमित प्रकाश यादव, खेडा जिल्हा पोलीस प्रमुख राजेश गढिया घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोक आणि अग्निशमन दलाच्या पथकाने ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर नदीत बुडालेल्या ६ मुलांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी मेहमदाबाद सरकारी रुग्णालयात पाठवले. या हृदयद्रावक घटनेमुळे कनीज गावात कुटुंबासह शोककळा पसरली आहे.

Web Title: 6 Members Of A Family Drown In River In Gujarat's Kheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.