6 ITBP Jawans Killed 2 injured As Colleague Opens Fire In Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
छत्तीसगडमध्ये जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

रायपूर: इंडो-तिबेटियन बोर्डर पोलीस दलातील जवानानं स्वत:च्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना नारायणपूरमध्ये घडली आहे. या गोळीबारात सहा जवानांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात सकाळी ९ च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.

आयटीपीबीच्या जवानानं त्याच्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यामध्ये त्याच्या सहा सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सुट्टी न मिळाल्यानं त्यानं हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.  
 

Web Title: 6 ITBP Jawans Killed 2 injured As Colleague Opens Fire In Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.