पंजाबमध्ये घुसले 7 दहशतवादी; जम्मूपासून दिल्लीपर्यंत हाय अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 14:09 IST2018-11-15T13:59:26+5:302018-11-15T14:09:12+5:30
दहशतवाद्यांनी बंदुकीच्या धाकानं गाडी पळवली

पंजाबमध्ये घुसले 7 दहशतवादी; जम्मूपासून दिल्लीपर्यंत हाय अलर्ट
चंदिगढ: पंजाबच्या फिरोजपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे सात दहशतवादी घुसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दहशतवादी दिल्लीच्या दिशेनं पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या हाती लागली आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे.
दहशतवादी घुसल्याची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांनी गस्त वाढवली आहे. सध्या सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. काल पठाणकोटच्या माधोपूर भागात चार संशयितांनी एक एसयूव्ही कार बंदुकीचा धाक दाखवून पळवून नेल्याची घटना घडली. त्यातच आता दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आल्यानं संपूर्ण राज्यातील पोलीस दलाला सतर्कतेचा इशारा देण्याचा आला आहे.