भोंगळ कारभार! "मी जिवंत आहे", महिला 19 वर्षे अधिकाऱ्यांकडे मारतेय चकरा, म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 14:03 IST2023-10-06T13:53:53+5:302023-10-06T14:03:13+5:30
आई आणि मुलगा दुसऱ्याच्या घरात राहून दिवस काढत आहेत. मुलाला इतर लोकांकडे मजूर म्हणून काम करत आहे.

भोंगळ कारभार! "मी जिवंत आहे", महिला 19 वर्षे अधिकाऱ्यांकडे मारतेय चकरा, म्हणते...
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका 59 वर्षीय महिलेने पंचायत, एसडीएम, जिल्हाधिकारी, आयुक्त आणि आमदार यांच्याकडे गेल्या 19 वर्षांपासून कागदावर स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी दाद मागितली आहे, परंतु अद्याप कोणतीही समस्या सुटलेली नाही. महिलेला ना अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळत आहे, ना पीएफ, ना कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा. गेल्या अनेक वर्षांपासून तिला इतर लोकांच्या आधाराने जगावे लागत आहे.
सागर येथे राहणाऱ्या 59 वर्षीय महिलेचे पती मुलायम सिंह हे अनूपपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीत फायटर म्हणून काम करायचे. 2003 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. आता उदरनिर्वाहाचे आव्हान कुटुंबासमोर होते. मुलगा राहुल खूपच लहान होता, त्यामुळे आईनेच अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता. याच दरम्यान महिलेच्या पायाखालची जमीन सरकली.
एक कागद सापडला ज्यात 40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये तिचा मृत्यू झाला होता. मकरोनिया ग्रामपंचायतीने हे जाहीर केले. 2004 मध्ये मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. तेव्हापासून ती महिला सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे, जेणेकरून मृत्यू प्रमाणपत्र नाकारण्यात येईल. या पत्रामुळे महिलेला अनुकंपा नियुक्तीच मिळाली नाही तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभही मिळू शकला नाही.
आई आणि मुलगा दुसऱ्याच्या घरात राहून दिवस काढत आहेत. मुलाला इतर लोकांकडे मजूर म्हणून काम करत आहे. एकीकडे जिल्हा आणि महापालिकेचे अधिकारी याप्रकरणी काहीही बोलणे टाळत असल्याचे दिसत आहे. मात्र, या प्रकरणाची माहिती समोर आल्याचे सागरचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.