शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
3
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
4
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
5
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
6
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
7
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
8
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
9
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
10
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
11
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
12
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
13
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
14
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
15
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
16
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
17
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
18
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
19
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
20
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात ५७ वाहन परवाने रद्द

By admin | Updated: March 20, 2015 22:39 IST

पुणे : मद्यपी आणि रॅश ड्रायव्हींग करणा-या ५७ वाहनचालकांचे वाहन परवाने प्रादेशीक परिवहन कार्यालयाने ९० दिवसांसाठी निलंबीत केले आहेत. रस्त्यांवरील गंभीर आणि प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी नियमभंग करणा-या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केल्यानंतर त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओला पाठवला होता.जानेवारी २०१५ ते ११ मार्चपर्यंतच्या ६४ प्रस्तावांपैकी ५७ वाहनचालकांचे परवाने निलंबीत करण्यात आल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

पुणे : मद्यपी आणि रॅश ड्रायव्हींग करणा-या ५७ वाहनचालकांचे वाहन परवाने प्रादेशीक परिवहन कार्यालयाने ९० दिवसांसाठी निलंबीत केले आहेत. रस्त्यांवरील गंभीर आणि प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी नियमभंग करणा-या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केल्यानंतर त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओला पाठवला होता.जानेवारी २०१५ ते ११ मार्चपर्यंतच्या ६४ प्रस्तावांपैकी ५७ वाहनचालकांचे परवाने निलंबीत करण्यात आल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीदरम्यान वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे एकूण १४०६ वाहन परवाने निलंबीत करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओकडे या वर्षीही जानेवारी २०१५ ते ११ मार्च २०१५ पर्यंत एकूण ६४ प्रस्ताव पाठवण्यात आले होते. यातील पुणे आरटीओने नियमभंग करणा-या ५७ वाहन चालकांचे परवाने रद्द केले आहेत. परवाने रद्द करण्यात आलेल्या वाहनचालकांना ९० दिवस वाहन चालविता येणार नाही. या काळात त्यांनी वाहन चालविल्यास त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे. दारु पिऊन तसेच रस्त्यावर वेडीवाकडी वाहने चालवल्यामुळे अपघातांचा धोका संभवतो. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातांमध्ये मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे. या कारवाईमुळे दारु पिऊन वाहन चालवण्याला काही प्रमाणात आळा बसेल असे उपायुक्त आवाड यांनी सांगितले.