शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ'चं वास्तव; 56% निधी फक्त प्रसिद्धीवर खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 10:02 IST

पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारी 2015 रोजी 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' योजनेची घोषणा केली

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ'साठी तरतूद करण्यात आलेला बहुतांश निधी प्रसिद्धीवर खर्च होत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. महिला-पुरुष जन्मदर सुधारण्यासाठी आणि महिलांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. त्यासाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांची तरतूदही केली. मात्र यातील तब्बल 56 टक्के निधी केवळ प्रसिद्धीसाठी खर्च करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारी 2015 रोजी 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' योजनेची घोषणा केली. महिला आणि बालविकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि मनुष्यबळ विकास या तीन मंत्रालयांकडून ही योजना राबवली जाते. या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीपैकी तब्बल 56 टक्के निधी प्रसिद्धीवर खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे एकूण निधीपैकी केवळ 25 टक्के निधी राज्य आणि जिल्हा पातळीवर देण्यात आला आहे. तर 19 टक्के निधी खर्चच करण्यात आलेला नाही. ही संपूर्ण आकडेवारी महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी दिली. संसदेत पाच खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कुमार यांनी ही आकडेवारी दिली. 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' योजनेवर आतापर्यंत 644 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील केवळ 159 कोटी रुपये जिल्हा आणि राज्य पातळीवर पाठवला गेला. सरकारची ही योजना अपयशी ठरली आहे का, असा प्रश्न काही खासदारांनी कुमार यांना विचारला. त्याला मंत्र्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. सरकारनं 640 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवल्याचं त्यांनी सांगितलं. सरकाररनं पहिल्या टप्प्यात स्त्री-पुरुष यांचा जन्मदर अतिशय कमी असलेल्या 100 जिल्ह्यांची निवड केली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात यात आणखी 61 जिल्ह्यांची भर पडली, अशी माहिती कुमार यांनी दिली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwomen and child developmentमहिला आणि बालविकासBJPभाजपा