५६ इंचाची छाती ५.६ इंचाची होणार - राहूल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2015 13:30 IST2015-07-17T13:30:40+5:302015-07-17T13:30:40+5:30

कुठल्याही परिस्थितीत जमिन अधिग्रहण विधेयक संसदेत मंजूर होऊ देणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पावसाळी अधिवेशन पण वादळी होणार याची चुणूक दाखवली

56 inch chest to be 5.6 inch - Rahul Gandhi's fierce criticism of Modi | ५६ इंचाची छाती ५.६ इंचाची होणार - राहूल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

५६ इंचाची छाती ५.६ इंचाची होणार - राहूल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. १७ - कुठल्याही परिस्थितीत जमिन अधिग्रहण विधेयक संसदेत मंजूर होऊ देणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पावसाळी अधिवेशन पण वादळी होणार याची चुणूक दाखवली. जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहूल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती हल्ला चढवला तसेच राजस्थानमधील सरकार वसुंधरा राजे यांचे सरकार नसून ललित मोदी यांचे सरकार असल्याची टीका केली.
नरेंद्र मोदींच्या ५६ इंचाची छातीचा संदर्भ देत काँग्रेस त्यांची ५६ इंचाची छाती सहा महिन्यांमध्ये ५.६ इंचावर आणेल असे सांगत पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा मानस राहूल गांधींनी व्यक्त केला. शेतक-यांची एक इंचदेखील जमीन जाऊ देणार नाही असे सांगत केंद्राच्या धोरणांवरही राहूलनी टीका केली. केंद्राबरोबरच राज्य सरकारवर टीका करताना हे सरकार सर्वसामान्य माणसासाठी काम करत नसून याचा रिमोट कंट्रोल लंडनमध्ये असल्याचे गांधी म्हणाले.

Web Title: 56 inch chest to be 5.6 inch - Rahul Gandhi's fierce criticism of Modi