Corona Vaccination: महाराष्ट्रात तब्बल 56 टक्के कोरोना लसी वापराविना; प्रकाश जावडेकरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 12:30 PM2021-03-17T12:30:07+5:302021-03-17T12:32:48+5:30

Corona Virus in Maharashtra: महाराष्ट्रात काल 17864 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. जावडेकर यांचे ट्विट अशावेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवरून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. 

56% Corona vaccines remained unused in Maharashtra, poor administration : prakash javdekar | Corona Vaccination: महाराष्ट्रात तब्बल 56 टक्के कोरोना लसी वापराविना; प्रकाश जावडेकरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

Corona Vaccination: महाराष्ट्रात तब्बल 56 टक्के कोरोना लसी वापराविना; प्रकाश जावडेकरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

googlenewsNext

देशात कोरोनाचा आकडा वाढू लागला आहे. मात्र, महाराष्ट्रात देशाच्या निम्म्याहून अधिक कोरोनाबाधित सापडू (Corona patient incresed in Maharashtra.) लागल्याने आता केंद्र विरोधात राज्य सरकार असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. पुणे, ठाण्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागल्याचे वृत्त आले होते. या वाढत्या रुग्णसंख्येवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (prakash javdekar) यांनी महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Government) मोठा आरोप लावला आहे. (Maharashtra Government had only used 23 lakh vaccines out of the total 54 lakh vaccines sent to the state, till 12th March. )


महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 44 टक्केच लसीचे लसीकरण झाले आहे. तर 56 टक्के लस पडून कशी राहिली असा सवाल केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी काही वेळापूर्वी ट्विट करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राने12 मार्चपर्यंत 23 लाख लसींचाच वापर केला आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एकूण 54 लाख लसी देण्यात आल्या होत्या.  याचाच अर्थ 56 टक्के लसींचा साठा वापरलाच नाहीय, असा आरोप केला आहे. 


एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस शिल्लक असताना शिवसेनेचे खासदार राज्याला आणखी अतिरिक्त लस हवी अशी मागणी करत आहेत. आधी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी गडबड-गोंधळ केला आता लसीकरणामध्येही तेच घडत आहे, असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. जावडेकर यांचे ट्विट अशावेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवरून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. 


मंगळवारीच केंद्राने झापलेले... 
महाराष्ट्रात काल 17864 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची ही चिन्हे आहेत, सबब लसीकरणाचा वेग वाढविला जावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली. त्या पाहणीच्या आधारावरच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्र लिहिले आहे.


१२,७४,००० डोस मिळणार -
महाराष्ट्राला १८ मार्चपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे आणखी १२,७४,००० डोस प्राप्त होणार आहेत. राज्यात लसींचा तुटवडा जाणवू दिला जाणार नसल्याचेही राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या’
कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या. अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. 

पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा - 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

Web Title: 56% Corona vaccines remained unused in Maharashtra, poor administration : prakash javdekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.