शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
2
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
3
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
4
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
5
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
7
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
8
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
9
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
10
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
11
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
12
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
13
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
14
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
15
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
16
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
17
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
18
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
19
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
20
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा

बापरे! देशावर कोरोनाचं संकट वाढतय, 24 तासांत आढळले एवढे रुग्ण; 49,000 व्हेंटिलेटरसाठी देण्यात आलीये ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 18:32 IST

अग्रवाल म्हणाले, हरियाणातील करनाल जिल्ह्यात 'अॅडॉप्ट अ फॅमिली’ अभियानांतर्गत 13,000 गरजू कुटुंबांना 64 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. पीपीई, मास्क आणि व्हेंटिलेटर्स यायला सुरुवात झाली आहे. भारतातील 20 उद्योजकांना पीपीई तयार करायला सांगितले आहे.

ठळक मुद्देदेशातील कोरोना बाधितांची संख्या 5,734 वर 'अॅडॉप्ट अ फॅमिली’ अभियानांतर्गत 13,000 गरजू कुटुंबांना 64 लाख रुपयांची मदतकोरोनाचा सामना करण्यासाठी रेल्वेचे 2,500 हून अधिक डॉक्टर्स आणि 35,000 पॅरामेडिकल कर्मचारी तैनात

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे देशावरील संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 5,734 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 473 जणांना रुग्णालयातून रेफर आणि डिस्चार्ज दिला असला तरी, गेल्या 24 तासांत 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कालपासून आजपर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर देशात एकूण 166 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात कोरोना व्हायसरची स्थिती, सुरू असलेल्या उपाय योजना आणि लॉकडाऊनच्या स्थितीसंदर्भात आज (गुरुवार) आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयाची संयुक्‍त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रार परिषदेत आरोग्य मंत्रालायाचे संयुक्‍त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

49,000 व्हेंटिलेटर्ससाठी देणयात आली ऑर्डर -

अग्रवाल म्हणाले, हरियाणातील करनाल जिल्ह्यात 'अॅडॉप्ट अ फॅमिली’ अभियानांतर्गत 13,000 गरजू कुटुंबांना 64 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. पीपीई, मास्क आणि व्हेंटिलेटर्स यायला सुरुवात झाली आहे. भारतातील 20 उद्योजकांना पीपीई तयार करायला सांगितले आहे. 1.7 कोटी पीपीईसाठी ऑर्डर देण्यात आली असून पुरवठाही सुरू झाला आहे. तसेच एकूण 49,000 व्हेंटिलेटर्ससाठीही ऑर्डर देण्यात आली आहे, असे लव अग्रवाल म्हणाले. 

रेल्वेचे 2,500 हून अधिक डॉक्टर्स आणि 35,000 पॅरामेडिकल कर्मचारी तैनात -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने 2,500 हून अधिक डॉक्टर्स आणि 35,000 पॅरामेडिकल कर्मचारी तैनात केले आहेत. त्यांचे 586 हेल्थ युनिट्स, 45 उप-विभागीय रुग्णालये, 56 विभागीय रुग्णालये, 8 उत्पादन युनिट रुग्णालये आणि 16 झोनल रुग्णालयांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी त्यांचा महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच रेल्वेने 80,000 आयसोलेशन बेड तयार करण्यासाठी 5,000 कोचसला आयसोलेशन यूनिटमध्ये परिवर्तित करत आहेत. यापैकी 3,250 तयारही करण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतrailwayरेल्वेdocterडॉक्टरMedicalवैद्यकीय