शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दलितांसाठी भाजपाने शिजवली पाच हजार किलो 'समसरता खिचडी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 11:26 IST

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पार्टीकडून दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

ठळक मुद्देभाजपाकडून दलित समाजासाठी 'भीम महासंगम'चे आयोजन 20 जानेवारीला युवा संकल्प रॅलीचे आयोजन 5,000 किलोची खिचडी विश्वविक्रम रचणार

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पार्टीकडून दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आज नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपातर्फे 'भीम महासंगम विजय संकल्प 2019' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. यादरम्यान,पाच हजार किलो 'समरसता खिचडी' तयार करुन त्याचे कार्यकर्त्यांमध्ये वाटप केले जाणार आहे.  

या खिचडीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्लीतील सर्व 14 जिल्ह्यांतील दलित घरांतून जाऊन तांदुळ, डाळ, मीठ आणि अन्य साहित्य जमवले आहे. या साहित्यातूनच समरसता खिचडी तयार केली जाणार आहे. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या खिचडीचा आस्वाद घेता येणार आहे. 

या रॅलीमध्ये दिल्लीतील भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी, थावर चंद गहलोत, रामलाल, श्याम जाजू यांच्यासहीत कित्येक वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.  दरम्यान, खिचडीसाठी तांदुळ आणि डाळ जमा करताना भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 14 लाख पत्रकांचं वाटप करुन मोदी सरकारच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार केला. 

(दलित मतांसाठी भाजपाची खेळी; अमित शहांच्या रॅलीमध्ये शिजणार खिचडी)

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवातून धडा घेत भाजपानं आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलित समाजासोबत संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि विश्वविक्रम रचण्यासाठी भाजपाकडून जवळपास 5,000 किलोग्रॅम खिचडी तयार करण्यात येत आहे.

(शहा यांनी महाराष्ट्रातील खासदारांना दिला निवडणूक जिंकण्याचा मंत्र)

नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ही समरसता खिचडी तयार करत आहेत. मनोहर आपल्या टीमसोबत 20 फूट व्यासाचे आणि सहा फूट खोल पात्रामध्ये खिचडी तयार करुन विश्वविक्रम रचणार आहेत. 

यापूर्वी ऑक्टोबर 2018मध्ये विष्णू मनोहर यांनी वेगवेगळे जिन्नस वापरून 3000 किलोची खिचडी एकाच भांड्यात तयार केली होती. सलग 53 तास नॉनस्टॉप कुकींगचा विश्वविक्रम करणारे शेफ विष्णू मनोहर यांनी घराघरात आणि गरीबांच्या ताटातील खिचडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न याद्वारे केला. जागतिक खाद्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी नागपुरातील चिटणीस पार्कमध्ये 3000 किलोची खिचडी तयार केली. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी कोल्हापुरातून खास प्रकारची कढई मागवली होती. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी 11 फुटांचा सराटा वापरला. लाकडाच्या इंधनाचा वापर करून त्यांनी स्वादिष्ट खिचडी तयार केली. 

टॅग्स :Vishnu Manoharविष्णु मनोहरAmit Shahअमित शहाSC STअनुसूचित जाती जमाती