शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला मोठं भगदाड पडणार; गुलाम नबींच्या समर्थनार्थ 5000 कार्यकर्ते पक्ष सोडणार! AAP लाही मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 21:12 IST

बुधवारी जम्मू-काश्मीरमधील आम आदमी पक्षाच्या 51 नेत्यांनीही पक्ष सोडला असून आझादांना पाठिंबा दिला. एवढेच नाही, तर गुरुवारी काँग्रेसचे तब्बल 5 हजार कार्यकर्ते पक्ष सोडून आझादांना पाठिंबा देणार आहेत. यावरूनच गुलाम नबी आझादांचा जम्मू-काश्मीरच्या राजकारणावर असलेला प्रभाव दिसून येतो. 

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडून अद्याप एक आठवडाही झालेलाना नाही, तोच आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर, आतापर्यंत काँग्रेसच्या 100 हून अधिक नेत्यांनी पक्षाला राम-राम ठोकून आझादांना पाठिंबा दिला आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरमधील आम आदमी पक्षाच्या 51 नेत्यांनीही पक्ष सोडला असून आझादांना पाठिंबा दिला. एवढेच नाही, तर गुरुवारी काँग्रेसचे तब्बल 5 हजार कार्यकर्ते पक्ष सोडून आझादांना पाठिंबा देणार आहेत. यावरूनच गुलाम नबी आझादांचाजम्मू-काश्मीरच्या राजकारणावर असलेला प्रभाव दिसून येतो. 

गुलाम नबी आझाद यांनी 26 ऑगस्टला काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्यांतून गुलाम नबींच्या राजीनाम्याने पक्षाला काही फरक पडत नाही, असे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आझादांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये फूट पडू लागली आहे. यामुळे काँग्रेसला प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमध्ये फटका बसताना दिसत आहे. देशाच्या राजकारणात आधीच गळती लागलेल्या काँग्रेससाठी हा मोठा आघात आहे.

काँग्रेसचे 5000 कार्यकर्ते आझादांना देणार समर्थन - मिरर नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ गुरुवारी उरी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरमधील 5000 काँग्रेस कार्यकर्ते सामूहिकपणे पक्षाचा राजीनामा देणार देत आझाद यांना पाठिंबा देणार आहेत. यापूर्वी बुधवारी काँग्रेसच्या 42 नेत्यांनी पक्षाचा राजीनामा देत आपण आझाद यांच्या पक्षात जाणार असल्याचे म्हटले आहे. एकूणच, आझाद यांनी आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील काँग्रेसचे 100 हून अधिक नेते आपल्यासोबत जोडले आहेत. तसेच, ते उद्याही हजारो कार्यकर्त्यांना आपल्यासोबत जोडणार आहेत.

आप कार्यकर्त्यांनीही दिलं आहे समर्थन - यापूर्वी बुधवारी जम्मू काश्मीरमध्ये आम आदमी पक्षाच्या 51 नेत्यांनी पभाचा राजीनामा देत आझादांना समर्थन दिले आहे. 

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर