शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

डोकलाममध्ये चीनकडून पुन्हा रस्ता बनवण्याचे काम सुरू, 500 सैनिक केले तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 7:48 AM

चीनसोबत सुरू असलेल्या डोकलाम वादावर तोडगा निघून एक महिनादेखील सरलेला नसताना चीननं पुन्हा डोकलाम परिसरात रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - चीनसोबत सुरू असलेल्या डोकलाम वादावर तोडगा निघून एक महिनादेखील सरलेला नसताना चीननं पुन्हा डोकलाम परिसरात रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी काम करत असलेल्यांना 500 चिनी सैनिकांचं संरक्षण देण्यात आले आहे.  डोकलामवर भूतान आणि चीन हे दोन्ही देश दावा सांगत आहेत आणि भारत यावर भूतानचं समर्थन करत आहे. मात्र या प्रकरणात चीनकडून लष्करी बळाचा वापर करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. त्यामुळे भूतानच्या रक्षणासाठी तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या संमतीनेच हिंदुस्थानने स्वतःचे लष्करी सामर्थ्य वापरण्याची तयारी ठेवली आहे.

जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. या रस्त्याची निर्मिती चिकन नेक नावानं ओळखल्या जाणा-या भारतीय जमिनीजवळ केली होती. दरम्यान हा परिसर भारतासाठी भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असा आहे. दरम्यान डोकलाम विवादावर जवळपास 70 दिवस भारत-चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यानंतर उपाय योजना काढत हा वाद मिटवण्यात आला होता आणि दोन्ही देशांनी आपआपल्या सैनिकांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता.यावेळी चीनने आपले बुलडोझर आणि रस्ता बनवण्याचे इतर सामान हटवल्याचे भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तर, रस्ता बनवण्याचे काम हे हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असेल, असे चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, आता चीनने ज्या भागात रस्त्याचे काम करण्यावरुन तणाव निर्माण झाला होता त्या ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावर आता रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आला आहे. नव्या रस्त्याच्या सुरक्षेसाठी चीनने तब्बल 500 सैनिक या परिसरात तैनात केले आहेत.

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलाम