शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना 50 हजार, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती; राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 06:33 IST

कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अर्थसाह्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यापुढे कोरोनाने जे रुग्ण मरण पावतील, त्यांच्याही कुटुंबीयांना ही मदत दिली जाईल.

नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल. आतापर्यंत देशात सुमारे ४ लाख ४६ हजार जण कोरोनाचे बळी ठरले आहेत.  कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अर्थसाह्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यापुढे कोरोनाने जे रुग्ण मरण पावतील, त्यांच्याही कुटुंबीयांना ही मदत दिली जाईल.

३० दिवसांत निर्णय घ्यावा- मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची रक्कम मिळण्यासाठी सरकारी छापील अर्ज संबंधित डॉक्टर वा रुग्णालय यांच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण सहायता निधी अधिकारी वा त्यांच्या कार्यालयात सादर करावा लागेल.- या अर्जावर संबंधित यंत्रणेला ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागेल. - आर्थिक मदत लाभार्थ्याच्या बँकेत थेट जमा करण्यात येईल. - आलेल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती असेल. - कोणताही अर्ज फेटाळताना त्याचे स्पष्ट कारण लेखी स्वरूपात देण्याची जबाबदारी या समितीची असेल.

कोणत्या राज्यात किती मृत्यू?महाराष्ट्र        १,३८,६१६कर्नाटक           ३७,६४८तामिळनाडू           ३५,३७९केरळ        २३,८९७ उत्तर प्रदेश        २२,८८७दिल्ली       २०,०८५ 

काेर्टाने केली होती विचारणानैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबास ज्या प्रकारे अर्थसाह्य दिले जाते, तोच निकष कोरोनाच्या मृतांबाबत का लावत नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्ये केंद्राला विचारला होता. तसेच मृत्यूच्या दाखल्यावर कोरोनाचा उल्लेख असावा, असेही सांगितले होते.

दोन डोसमधील अंतर कमी होणार?खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या कोविशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये सध्या असलेले १२ ते १६ आठवड्यांचे अंतर कमी करून ते चार आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे. केरळ उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या एका आदेशानंतर सरकार हे पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय