५० टक्के भारतीय मोदींच्या कामावर समाधानी
By Admin | Updated: August 13, 2014 10:11 IST2014-08-13T09:59:19+5:302014-08-13T10:11:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर ५० टक्के भारतीय समाधानी असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर ३० टक्के भारतीयांना मोदींचा परफॉमन्स अपेक्षेपेक्षाही सुमार होता असे वाटते.

५० टक्के भारतीय मोदींच्या कामावर समाधानी
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर ५० टक्के भारतीय समाधानी असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर ३० टक्के भारतीयांना मोदींचा परफॉमन्स अपेक्षेपेक्षाही सुमार होता असे वाटते.
मोदींसोबत भारत बदला ही ऑनलाइन कम्युनिटी सुरु करण्यात आली असून या कम्युनिटीतर्फे नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. यात मोदी सरकारच्या दोन महिन्यांच्या कामकाजाविषयी जनतेच्या भावना जाणून घेण्यात आल्या. यात सुमारे १ लाख ३० हजार सदस्यांनी सहभाग घेतला होता. या सर्वेक्षणाविषयी माहिती देताना कम्युनिटीचे प्रमुख व पब्लिक पॉलिसी एक्सपर्ट आर.पी. गुप्ता म्हणाले, भाजप सरकारच्या कामकाजासंदर्भात ५० टक्के मतदार समाधानी आहे. २० टक्के भारतीयांना मोदींनी अपेक्षेपेक्षाही जास्त काम केल्याचे वाटते. मात्र ३० टक्के लोकांनी मोदींनी अपेक्षेपेक्षाही कमी काम केल्याचे म्हटले आहे. या वर्षी चार राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला ८० टक्के जागांवर यश मिळू शकते असे भाकीतही गुप्ता यांनी वर्तवले.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४२ टक्के लोकांना भ्रष्टाचारविरोधात लढा देण्यास मोदींनी प्राध्यान्य द्यायला हवे असे वाटते. त्याखालोखाल २६ टक्के लोकांना रोजगार निर्मिती आणि आर्थिक वृद्धीवर मोदींनी भर द्यावा असे वाटते होते. तर मोदींनी सर्वप्रथम महागाईवर नियंत्रण आणावे असे २४ टक्के लोकांना वाटले.वाराणसी मतदारसंघातील मतदारांनीही स्वचछता, इन्फ्रास्ट्रक्चर यावर मोदींनी भर द्यावा असे सांगितले. मोदी याच मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले आहेत. सर्वेक्षण करणारे गुप्ता हे भाजपमधील सक्रीय सदस्य आहेत. भाजपचा जाहीरनामाही तयार करणा-या समितीमध्ये त्यांचा समावेश होता.