शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

...तर भाजपच्या ५० टक्के विधानसभा सदस्यांची आमदारकी जाणार; योगींसमोर नवा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 15:43 IST

योगींच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबतची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण योगींचं हे पाऊल त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यात नवी लोकसंख्या नीति (Population Bill) आणण्याची घोषणा केली आहे. योगींच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबतची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण योगींचं हे पाऊल त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण नव्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यानुसार तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना निवडणुकीला उभं राहता येणार नाही. यामुळे उत्तर प्रदेशच्या विधानसभेतील भाजपच्या एकूण आमदारांपैकी ५० टक्के आमदार अपात्र ठरतील अशी माहिती समोर आली आहे. (50 percent of UP BJP MLAs have 3 or more kids would get disqualified if Population Bill gets implemented)

उत्तर प्रदेश विधानसभेकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या अधिकृत वेबसाइट्सवर एकूण ३९७ विधानसभा सदस्यांची वैयक्तिक माहिती अपडेट करण्यात आलेली आहे. यातील ३०४ सदस्य सत्ताधारी भाजपचे आहेत आणि त्यात १५२ आमदार म्हणजेच निम्म्या आमदारांना तीन किंवा त्याहून अधिक अपत्य आहेत. 

लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्ताव आणणाऱ्या भाजप खासदाराला किती मुलं? नेटकऱ्यांनी शोधून काढलं

इतकंच नव्हे, तर भाजपच्या एका आमदाराला ८ अपत्य आहेत. तर आणखी एका आमदाराला ७ अपत्य आहेत. याशिवाय ८ आमदारांना प्रत्येकी ६ अपत्य आहेत. तर १५ सदस्यांना प्रत्येकी ५ अपत्य आहेत. सत्ताधारी भाजपच्या एकूण आमदारांपैकी ४४ आमदारांना प्रत्येकी ४ अपत्य आहेत. तर ८३ आमदारांना प्रत्येकी ३ अपत्य आहेत. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू झाल्यास हे सर्व विधानसभा सदस्य नियमानुसार अपात्र ठरू शकतात. 

दरम्यान, लोकसभेत देखील लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं विधेयक मांडली जाण्याची दाट शक्यता आहे. यात गोरखपूरचे खासदार रवी किशनदेखील लोकसंख्या नियंत्रणाबद्दल खासगी विधेयक मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण खुद्द रवी किशन यांनाच चार अपत्य आहेत. त्यामुळे त्यांचं नाव पुढे येताच सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली. लोकसंख्या नियंत्रणाचा आग्रह धरणाऱ्या रवी किशन यांनाच ४ मुलं आहेत, याकडे अनेकांनी लक्ष वेधलं. काहींनी रवी किशन यांचा कुटुंबासोबतचा फोटो ट्विट केला, तर काहींनी या परिस्थितीला दिव्याखाली अंधार म्हणत खिल्ली उडवली. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा