रायपूरमध्ये शामियाना कोसळून ५० जण जखमी

By Admin | Updated: May 9, 2015 00:16 IST2015-05-09T00:16:41+5:302015-05-09T00:16:41+5:30

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला शामियाना कोसळून शुक्रवारी सुमारे ५० जण

50 people injured in Shamiyana collapse in Raipur | रायपूरमध्ये शामियाना कोसळून ५० जण जखमी

रायपूरमध्ये शामियाना कोसळून ५० जण जखमी

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला शामियाना कोसळून शुक्रवारी सुमारे ५० जण जखमी झाले. यात बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून नवे रायपूरचा मोदींचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आता मोदी केवळ दंतेवाडा येथील कार्यक्रमांत सहभागी होतील.
शामियाना उभारण्याच्या कामास अंतिम रूप दिले जात असतानाच, अचानक वादळी पाऊस सुरु झाला. यामुळे शामियानाचा एक भाग येथे उपस्थित पोलीस कर्मचारी व मजुरांच्या अंगावर पडला. या घटनेनंतर मोदींच्या कार्यक्रमात बदल करत त्यांचा याठिकाणचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. (वृत्तसंस्था)

 

Web Title: 50 people injured in Shamiyana collapse in Raipur