शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

५ राज्यांतील निवडणुका; भाजपची पूर्वतयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 09:03 IST

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोव्याचा समावेश

ठळक मुद्दे२०२२ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात आपलीच सत्ता टिकून राहावी म्हणून भाजप प्रयत्नांची शिकस्त करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या पाच राज्यांमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली. पंजाब वगळता अन्य चार राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे.

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचे सांगितले जाते. २०२२ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात आपलीच सत्ता टिकून राहावी म्हणून भाजप प्रयत्नांची शिकस्त करणार आहे. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अधूनमधून रंगत असते. त्यामुळे यासंदर्भात भविष्यात नेमका काय निर्णय होतो याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

शनिवारी झालेल्या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, स्मृती इराणी, किरण रिजिजू आदी नेते उपस्थित होते. 

पंजाबकडेही लक्षपंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. या राज्यातही भाजपला पूर्वीपेक्षा अधिक यश मिळावे म्हणून रणनीती आखण्याचे ठरविले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक