शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

कुणालाही लक्षात ठेवयची इच्छा होणार नाही हे 'जीवघेणं वर्ष' 2020; 'ही' आहेत 5 मोठी कारणं

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 31, 2020 21:07 IST

एका अदृष्य शत्रूने संपूर्ण जगालाच गुडघे टेकायला भाग पाडले. लाखोंचे बळी घेतले. या अदृष्य शत्रूला पराभूत करण्यासाठी आजूनही प्रयत्न सुरूच आहेत.

नवी दिल्ली - कोरोना महामारीने वर्ष 2020 हे अत्यंत कटू बनवले आहे. यामुळे हे वर्ष लक्षात ठेवायची कुणाचीही इच्छा होणार नाही. एका अदृष्य शत्रूने संपूर्ण जगालाच गुडघे टेकायला भाग पाडले. लाखोंचे बळी घेतले. या अदृष्य शत्रूला पराभूत करण्यासाठी आजूनही प्रयत्न सुरूच आहेत. खरे तर 2020 विसरण्याचे आणखीही अनेक कारणे आहेत, मात्र, या 5 कारणांनी 2020 अत्यंत कटू बनवले.

कोरोनाने लाखो बळी घेतले -कोरोना महामारीने जगभरात आतापर्यंत 18 लाखहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर 8 कोटींहून अधिक लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. एकट्या भारतातच 10 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा दीड लाखवर पोहोचला आहे. त्यामुळे, असे जीवघेणे वर्ष कुणाला लक्षात ठेवायची इच्छा होईल?

स्थलांतरीत मजुरांच्या हतबलतेचे दृष्य, आजही डोळ्यात पाणी आणते -कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांचे अत्यंत हाल झाले. त्यांचे ते दृष्य आजही पाहिले, की डोळ्यात पाणी उभे राहते. त्यावेळचे या मजुरांचे पलायन हे अभूतपूर्व होते. डोक्यावर उन तळपत असताना या मजुरांनी शेकडो किलेमिटरची पायपीट करून आपले घर गाठले. अनेकांचा रस्त्यातच तर अनेकांचा घरी पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. अनेक मजूर तर ट्रक, टँकरमध्ये अक्षरशः जणावरांपेक्षाही वाईट स्थितीत आपल्या खरी पोहोचले. अनेक मजुरांचा अपघातातही मृत्यू झाला.

अर्थव्यवस्था घसरली, लाखो नोकऱ्या गेल्या -कोरोना महामारीचा फटका केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या अर्थव्यवस्थेला बसला. भारतीय अर्थव्यवस्था पहिल्यांदाच मंदीच्या सावटात पोहोचली. यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एवढेच नाही, तर अनेकांच्या वेतनातही कपात झाली. खरे तर अनेकांच्या रोजी रोटीचाच प्रश्न कोरोनाने उभा केला होता. मात्र आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे.

देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एदा दंगल -देशाची राजधानी असलेल्या दिल्लीवर फेब्रुवारी 2020मध्ये पुन्हा एकदा दंगलीचा डाग लागला. नॉर्थ-ईस्ट दिल्लीमध्ये 24 आणि 25 फेब्रुवारीला भीषण सांप्रदायिक दंगे झाले. यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

हाथरस कांड -ज्या प्रमाणे 2012मध्ये निर्भया सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला होता, अगदी त्याच प्रमाणे 2020 मध्येही हाथरस प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. उत्तर प्रदेशातील हथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 14 सप्टेंबरला सामूहिक बलात्कार झाला. आरोपींनी तिचा मृत्यू झाल्याचे समजून तिला सोडून दिले. नंतर 29 सप्टेंबला दिल्लीतील एका रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. यामुद्द्यावरून देशातील राजकारणही मोठ्या प्रमाणावर तापले होते. अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. यानंतर सीबीआयने चार्जशीट दाखल केली आहे. 

टॅग्स :New Yearनववर्षcorona virusकोरोना वायरस बातम्याHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार