CoronaVirus News: कोरोनानं संपूर्ण कुटुंब संपवलं; अवघ्या आठवड्याभरात पाच जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 08:59 AM2021-04-22T08:59:54+5:302021-04-22T09:05:50+5:30

CoronaVirus News: एका आठवड्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू; परिसरावर शोककळा

5 People Of The Same Family Die From Infection Of Coronavirus In jharkhands Dhanbad | CoronaVirus News: कोरोनानं संपूर्ण कुटुंब संपवलं; अवघ्या आठवड्याभरात पाच जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

CoronaVirus News: कोरोनानं संपूर्ण कुटुंब संपवलं; अवघ्या आठवड्याभरात पाच जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Next

धनबाद: देशातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढत आहे. देशात दररोज कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा दिवसभरात कोरोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांमध्ये हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. काल तर तो ३ लाखांच्या जवळ पोहोचला. कोरोनामुळे संपूर्ण कुटुंब बाधित झाल्याच्या घटना समोर येत आहेत. झारखंडमधल्या धननबादमध्ये घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

तीन दिवसांपासून घरात पडून होता कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह; शेजारी पोहोचताच...

धनबादमधील एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या आठवडाभरात एकाच कुटुंबातील ५ जणांनी कोरोनामुळे प्राण सोडला. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. एक-एक दिवसाच्या अंतरानं कुटुंबातील सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एक कुटुंबच उद्ध्वस्त झालं. गोविंदपूरमधील बरवाअड्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोनानं मृत्यू झाल्यानं प्रशासनानं संपूर्ण परिसर सील केला आहे.

भारतात ऑक्सिजनचे मागणीपेक्षा उत्पादन अधिक, तरीही निर्माण झालीय टंचाई, समोर आले धक्कादायक कारण

गावातील अनेकांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गाव सील करण्याची आवश्यकता होती, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सामान पोहोचवलं जात आहे. याशिवाय लोकांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली असून पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांवर उपचारदेखील सुरू करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी धनबादमध्येच एका कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यावेळी झारखंडच्या धनबादमधल्याच एका कोट्यधीश कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. एक वृद्ध महिला विवाह सोहळ्याला गेली होती. तिथे तिला कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या पाच मुलांचादेखील मृत्यू झाला. हे कुटुंब धनबादमधल्या कतरास येथे वास्तव्यास होतं. 

Web Title: 5 People Of The Same Family Die From Infection Of Coronavirus In jharkhands Dhanbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.