बोगस SC सर्टिफिकेटवर मंत्र्यासह ५ खासदार संसदेत गेले; जीतनराम मांझी यांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 22:09 IST2021-10-20T22:09:01+5:302021-10-20T22:09:43+5:30
Jeetanram Manjhi, Navneet Rana: भगवान राम हे एक काल्पनिक पात्र होते, असे ते म्हणालेले. संतहे रामापेक्षा हजारो पटींनी मोठे होते. हा माझा व्यक्तीगत विचार होता, मी कोणाच्या भावना दुखवत नाहीय, असे ते आज म्हणाले.

बोगस SC सर्टिफिकेटवर मंत्र्यासह ५ खासदार संसदेत गेले; जीतनराम मांझी यांचा खळबळजनक दावा
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि HAM पार्टीचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी आज खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, केंद्रीय मंत्र्यांसह पाच खासदारांनी बोगस जात प्रमाणपत्रावर संसदेच्या जागा बळकावल्या आहेत. त्यांची चौकशी व्हावी अशा मागणी मांझी यांनी केली आहे.
या जागा अनुसूचित जाति (एससी) साठी आरक्षित होत्या. पक्षाच्या एका मिटिंगमध्ये त्यांनी खासदारांची नावे घेतली आहेत. केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल आणि जे शिवाचार्य महास्वामी यांनी बोगस जात प्रमाणपत्रे मिळविली आहेत. हे भाजपाचे आहेत. तर काँग्रेसचे मोहम्मद सादिक, तृणमूलचे अपरूपा पोद्दार आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे नाव घेतले. हे खासदार आरक्षित जागांवर बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा उच्च न्यायालयाने निकाल दिला होता. याविरोधात नवनीत राणा या सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत. तर बघेल यांची जात उत्तर प्रदेशमध्ये एससीमध्ये समाविष्ट आहे, असे सांगितले आहे. उर्वरितांनी आधीच हे आरोप फेटाळले आहेत.
रामावरील वक्तव्यावर ठाम
रामायण रचणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांना देशाने श्रद्धांजली अर्पण केली तेव्हा मांझी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. भगवान राम हे एक काल्पनिक पात्र होते, असे ते म्हणालेले. संतहे रामापेक्षा हजारो पटींनी मोठे होते. हा माझा व्यक्तीगत विचार होता, मी कोणाच्या भावना दुखवत नाहीय, असे ते आज म्हणाले.