टंचाईिनवारणासाठी ५ कोटींचा निधी विंधन विहिर : मनपा फंडातून प्रभाग समितीला २५ लाख

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:10+5:302015-08-28T23:37:10+5:30

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्यात अद्यापही यश आले नसून चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे़ मांजरा प्रकल्पात पाणीसाठाच शिल्लक नसल्याने नागरिकांची ओरड वाढली आहे़ टँकरच्या माध्यमातून तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ प्रभागनिहाय वाढती ओरड लक्षात घेऊन महापौर अख्तर शेख यांनी जवळपास ५ कोटींचा निधी मनपा फंडातून टंचाई निवारणासाठी दिला आहे़

5 crores of fund for scarcity-scarcity; Fuel wells: 25 lakhs from Ward Committee | टंचाईिनवारणासाठी ५ कोटींचा निधी विंधन विहिर : मनपा फंडातून प्रभाग समितीला २५ लाख

टंचाईिनवारणासाठी ५ कोटींचा निधी विंधन विहिर : मनपा फंडातून प्रभाग समितीला २५ लाख

तूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्यात अद्यापही यश आले नसून चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे़ मांजरा प्रकल्पात पाणीसाठाच शिल्लक नसल्याने नागरिकांची ओरड वाढली आहे़ टँकरच्या माध्यमातून तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ प्रभागनिहाय वाढती ओरड लक्षात घेऊन महापौर अख्तर शेख यांनी जवळपास ५ कोटींचा निधी मनपा फंडातून टंचाई निवारणासाठी दिला आहे़
पाणी मिळत नसल्याची ओरड दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांकडून थेट नगरसेवकांना पाण्यासंदर्भात विचारणा केली जात आहे़ उपाययोजना काय, यावर उत्तर देण्याचेच नगरसेवकांकडून टाळले जात होते़ पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पाणी कमी जास्त प्रमाणात सोडण्याबाबत सूचना केल्या जात होत्या़ नागरिकांच्या तक्रारीने वैतागलेल्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले़ टंचाईच्या विशेष सभेतही पाण्याच्या विषयावर मोठा गोंधळ झाला होता़ टंचाई निवारणासाठी महापालिका सरसावली आहे़ त्यानुसार महापौरांनी प्रभागनिहाय विंधन विहिरींचे नियोजन केले आहे़ नगरसेवकांना आपापल्या प्रभागात विंधन विहिर व टंचाईवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी प्रत्येकी ५ लाख रूपयांचा निधी दिला आहे़ यातून विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत़
टंचाईच्या कामाला प्राधान्य़़़
पाणीटंचाई निवारणासाठी मनपा फंडातून प्रत्येक नगरसेवकाला ५ लाख व प्रभाग समितीला २५ लाख असे एकुण जवळपास ५ कोटी रूपये देण्यात आले आहेत़ या निधीतून प्रत्येक प्रभागात ५ विंधन विहिरी घेण्यात याव्यात असे सुचविण्यात आले आहे़ मनपा फंडातून देण्यात आलेल्या या निधीतून टंचाई निवारणाचेच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापौर अख्तर शेख यांनी दिली़

Web Title: 5 crores of fund for scarcity-scarcity; Fuel wells: 25 lakhs from Ward Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.