शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची फोरजी सेवा ऑक्टोबरपासून कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 19:46 IST

उशिरा का होईना बीएसएनएलची फोरजी सेवा उपलब्ध होणार

ठळक मुद्देदेशभरातील बीएसएनएलच्या जमिनींच्या विक्रीतूनही निधी उभारला जाणारमोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेमुळे सेवेचे दर अत्यंत कमी

पुणे : भारत दूरसंचार निर्माण लिमिटेडला (बीएसएनएल) येत्या १ एप्रिलपासून फोरजी स्पेक्ट्रम मिळणार आहे. मात्र, ग्राहकांना दर्जेदार फोरजी सेवा देण्यासाठी ऑक्टोबर २०२० उजाडेल, अशी माहिती बीएसएनएल बोर्डाच्या मनुष्यबळ विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी सोमवारी दिली. बीएसएनएलला फोरजी सेवेची परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे उशीरा का होईना बीएसएनएलची फोरजी सेवा उपलब्ध होणार आहे. याबाबत माहिती देताना वडनेरकर म्हणाले, केंद्र सरकारने बीएसएनएलला मजबूत करण्यासाठी फोरजी सेवेची परवानगी दिली आहे. तसेच, सरकारी हमी असलेल्या बॉँडच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपये उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देखील उपलब्ध होईल. त्याच जोडीला देशभरातील बीएसएनएलच्या जमिनींच्या विक्रीतूनही निधी उभारला जाईल. त्यामुळे येत्या दोनवर्षात बीएसएनएल नक्कीच नफा मिळवेल. ग्रामीण भागामधे सेवा देण्यासाठी भारत एअर फायबर ही योजना सुरु केली असून, लवकरच राज्यभरात ही सेवा उपलब्ध होईल. ऑफ्टीकल फायबर आणि एअर सर्व्हीसद्वारे ही सेवा दिली जाईल. ग्रामीण भागातही इंटरनेटचा वेग ४० मेगा बाईट्स पर सेकंद (एमबीपीएस) होईल, असे वडनेरकर यांनी सांगितले. -* फाईव्ह जी दूर, मोबाईल दर पूर्ववत होतीलसध्या मोबाईल कंपन्या अडचणीतून जात आहेत. त्यामुळे कोणतीही कंपनी सध्या फाईव्हजीमधे गुंतवणूक करणार नाही. कारण त्यासाठी टॉवरची संख्या वाढवावी लागेल. तसेच, फायबर लाईनदेखील टाकाव्या लागतील. सध्या टेलिकॉम कंपन्यांना परवडणारे नसल्याने उशीरा फोरजी सेवा सुरु होऊनही फारसा परिणाम होणार नाही. उलट मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेमुळे सेवेचे दर अत्यंत कमी झाले आहेत. विकसित देशामधे आपल्यापेक्षा इंटरनेट डाटा अधिक किंमतीला दिला जातो. त्यामुळे इंटरनेटचे दर पुन्हा पूर्वपदावर येतील, असे अरविंद वडनेरकर यांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेBSNLबीएसएनएलInternetइंटरनेटMobileमोबाइलCentral Governmentकेंद्र सरकार