जळगावात आश्रमशाळेत ४६ लाखांचा अपहार

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:10+5:302015-08-02T22:55:10+5:30

46 lakhs abduction in Jalgaon Ashramshala | जळगावात आश्रमशाळेत ४६ लाखांचा अपहार

जळगावात आश्रमशाळेत ४६ लाखांचा अपहार

>यावल (जि. जळगाव) : मनवेल येथील उज्ज्वल शिक्षण संस्थेच्या आदिवासी आश्रमशाळेत शासकीय अनुदानातील ४६ लाखांच्या निधीचा अपहार झाला आहे. त्याप्रकरणी तत्कालीन आदिवासी प्रकल्पाधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांच्यासह संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक व इतर आठ संचालकांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी मोतीलाल बाविस्कर यांनी याप्रकरणी न्यायालयात फिर्याद दिली होती़ ४६ लाख सात हजार ८९८ रुपये शाळेसाठी खर्च न करताना संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील व अन्य सात संचालकांनी स्वत:साठी खर्च करून शासकीय रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शुक्राचार्य दुधाळ, हुकूमचंद पाटील, संचालक मीरा रामकृष्ण पाटील (भुसावळ), जयश्री प्रकाश चौधरी (यावल), यादव लक्ष्मण पाटील (कोदगाव), मंगलराव देवीदास पाटील, हिरामण आनंदा पाटील, देविदास सदाशिव पाटील (मनवेल) व मुख्याध्यापक संजय लोटण अलोने (यावल) यांचा समावेश आहे. २००७-२०१४ दरम्यान शिक्षण संस्थेला मिळालेल्या अनुदानाचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 46 lakhs abduction in Jalgaon Ashramshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.