इराकमधील ४६ भारतीय नर्सेस सुरक्षित
By Admin | Updated: July 4, 2014 15:20 IST2014-07-03T17:08:02+5:302014-07-04T15:20:14+5:30
इराकमध्ये अडकलेल्या ४६ भारतीय पारिचारिका (नर्सेस )सुरक्षित आहेत अशी माहिती गुरूवारी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन यांनी दिली आहे.

इराकमधील ४६ भारतीय नर्सेस सुरक्षित
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३ - इराकमध्ये अडकलेल्या ४६ भारतीय पारिचारिका (नर्सेस)सुरक्षीत आहेत अशी माहिती गुरूवारी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन यांनी दिली आहे.
इराकमध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने अनेकांना टिकरीमध्ये बंदीस्त केले आहेत. यामध्ये ४६ भारतीय पारिचारिकेचा (नर्सेस) यांचा समावेश असून या नर्सेसमध्ये केरळ येथील नर्सेस मोठया प्रमाणावर आहेत. इराकमध्ये नर्सना घेऊन जाणा-या बसजवळ बॉम्बस्फोट झाला असून यात काही नर्सेस जखमी झाल्याची माहिती समोर येत होती. मात्र ही माहिती चुकीची असून कोणताही बॉम्बस्फोट झाला नसून दुस-या कारणामुळे गाडीची केवळ एक काच तुटली आहे असे सांगत भारतीय महिला सुरक्षीत आहेत असे सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितले. तसेच या सर्व नर्सेसना सुरक्षीत स्थळी ठेवण्यात आले आहे असेही सय्यद अकबरुद्दीन म्हणाले. भारतीय नर्सेसना सुरक्षीत आणण्यात यावे यासाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भेट घेतली होती.