शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील कनिष्ठ न्यायालयांत ४.४१ कोटी खटले प्रलंबित; उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात सर्वाधिक खटले तुंबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 06:25 IST

१५ जुलै २०२३ पर्यंत उत्तर प्रदेशात १.१६ कोटी, तर महाराष्ट्रात ५१ लाख खटले प्रकरणे प्रलंबित आहेत.

हरीश गुप्ता - नवी दिल्ली : देशातील जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालयांमध्ये ४.४१ कोटी दिवाणी आणि फौजदारी खटले प्रलंबित असून, त्यापैकी सर्वाधिक प्रलंबित खटल्यांचे प्रमाण उत्तर प्रदेशमहाराष्ट्रात आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या न्यायालयांतील खटले प्रलंबित राहण्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढतच आहे. त्यात कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. १५ जुलै २०२३ पर्यंत उत्तर प्रदेशात १.१६ कोटी, तर महाराष्ट्रात ५१ लाख खटले प्रकरणे प्रलंबित आहेत.

या आकडेवारीत उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा समावेश नाही. तेथेही मोठ्या प्रमाणावर खटले प्रलंबित आहेत. १५ जुलै २०२२ च्या तुलनेत एका वर्षात खटल्यांमध्ये १६ लाखांनी वाढ झाली. त्यावेळी प्रलंबित खटले ४.२५ कोटी होते. 

दिवाणी आणि फौजदारी खटले एका वर्षात प्रलंबित राहण्याचे प्रमाण उत्तर प्रदेशात ११ लाखांनी आणि महाराष्ट्रात एक लाखाने वाढले असेल तर राज्य सरकारांनी काही तरी पावले उचलली पाहिजेत, हेच यातून सूचित होते. संगणकीकृत जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालयांची संख्या १८,७३५ पर्यंत वाढली आहे. 

न्यायिक सुविधांसाठी दिले १० हजार कोटी- राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले की, न्यायालयांमधील प्रलंबित खटले निकाली काढणे, हे न्यायव्यवस्थेच्या कक्षेत आहे. १५ जुलै २०२३ पर्यंत केंद्र सरकारने न्यायिक पायाभूत सुविधांसाठी १००३५ कोटी रूपये दिलेले आहेत. - सरकार उच्च न्यायव्यवस्थेतील रिक्त पदे नियमितपणे भरत आहे. अधीनस्थ न्यायव्यवस्थेतील रिक्त पदे भरण्याचा मुद्दा राज्य सरकारे आणि संबंधित उच्च न्यायालयांच्या कार्यक्षेत्रात येतो.

न्यायमूर्तींची नियुक्ती नऊ वर्षांच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात ५६ न्यायमूर्ती, उच्च न्यायालयांत ९१९ नवीन न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. ६५३ अतिरिक्त न्यायमूर्तींना कायम केले. हायकोर्टातील न्यायमूर्तींची मंजूर संख्या ९०६ वरून १११४ करण्यात आली.

किती खटले प्रलंबित?    उत्तर प्रदेश    ११६    महाराष्ट्र    ५१    बिहार    ३५    प. बंगाल    २९    गुजरात    १७    हरयाणा    १५    दिल्ली    १२ 

टॅग्स :Courtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेश