४३ हजारांची भर, ३५ हजार वगळले मतदार नाव नोंदणी: १८ वर्षांचे नवमतदार ३१३३

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:37+5:302015-01-22T00:07:37+5:30

नागपूर: १ ते १६ डिसेंबर २०१४ दरम्यान राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ४३ हजार ६१३ नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली तर ३५ हजार ९४५ नावे यादीतून वगळण्यात आली. १८ वर्षांच्या एकूण ३१३३ तरुणांनी त्यांच्या नावाची नोंद केली.

43 thousand plus, 35 thousand registered voters registration: 18 year old 3133 | ४३ हजारांची भर, ३५ हजार वगळले मतदार नाव नोंदणी: १८ वर्षांचे नवमतदार ३१३३

४३ हजारांची भर, ३५ हजार वगळले मतदार नाव नोंदणी: १८ वर्षांचे नवमतदार ३१३३

गपूर: १ ते १६ डिसेंबर २०१४ दरम्यान राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ४३ हजार ६१३ नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली तर ३५ हजार ९४५ नावे यादीतून वगळण्यात आली. १८ वर्षांच्या एकूण ३१३३ तरुणांनी त्यांच्या नावाची नोंद केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली होती. मतदार होण्यास पात्र सर्व नागरिकांनी त्यांच्या नावाची नोंद करण्यावर आयोगाने भर दिला आहे व त्यासाठी वेळोवेळी विशेष कार्यक्रमही राबविले जात आहेत. २१ जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील पुरवणी मतदार यादी (१ जाने. २०१५ अहर्ता दिनांकाच्या आधारे) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ३७ लाख १२ हजार ४४४ मतदार आहेत. त्यात १९ लाख २९ हजार ६४४ पुरुष तर १७ लाख ८२ हजार ७४७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. इतर मतदारांची संख्या ५३ आहे. विशेष मोहिमेत ४३ हजार ६१३ नवीन नावे यादीत समाविष्ट करण्यात आली तर ३५ हजार ९४५ नावे यादीतून वगळण्यात आली.

चौकट
नागपूर जिल्हा
एकूण मतदार -३७ लाख १२ हजार ४४४
पुरुष मतदार -१९ लाख २९ हजार ६४४
स्त्री मतदार -१७ लाख ८२ हजार ७४७
इतर - ५३
-०-०-०-०-
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदर
मतदारसंघ मतदार
काटोल २,४८,८६२
सावनेर २,७२,७९३
हिंगणा ३,०८,७८७
उमरेड २,६४,०१३
द-पश्चिम ३,४३,५६७
दक्षिण ३,४४,२९८
पूर्व ३,३०,६५०
मध्य २,९४,३५९
पश्चिम ३,३२,१४९
उत्तर ३,४१,६२१
कामठी ३,८०,५८०
रामटेक २,५०,७६५

Web Title: 43 thousand plus, 35 thousand registered voters registration: 18 year old 3133

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.