शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये 24 तासांत 416 जणांना अटक; कारण जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 13:02 IST

सरमा म्हणाले, "ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलत राहू."

आसाम सरकारने बालविवाहाविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. यासंदर्भात बोलताना, राज्यात बालविवाहाविरोधातील कारवाईच्या तिसऱ्या टप्प्यात 416 जणांना अटक करण्यात आली आहे. 21-22 डिसेंबरच्या रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली होती, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी रविवारी दिली. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी 335 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बाल विवाहविरोधात आसाम सरकार स्ट्रिक्ट -आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. सरमा म्हणाले, "ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलत राहू. राज्य सरकारने 2023 मध्ये फेब्रुवारी आणि ऑक्टोबर या दोन टप्प्यांत बालविवाहविरोधी मोहीम सुरू केली होती. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात 4,515 गुन्हे दाखल करून 3,483 जणांना अटक करण्यात आली होती. तर ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या टप्प्यात 710 गुन्हे दाखल करून 915 जणांना अटक करण्यात आली होती.

बाल विवाहाचे प्रमाण कमी झाले - आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या (17 जुलै) दिवशी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हणण्यात आले आहे की, बालविवाह प्रकरणांमध्ये कायदेशीर हस्तक्षेप करण्यावर आसाम सरकारने दिलेला भर, आता उर्वरित देशासाठी आदर्श बनला आहे. आसाम सरकारच्या या कायदेशीर धोरणामुळे 2021-22 आणि 2023-224 या वर्षांत राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये बालविवाहात 81 टक्क्यांनी घट झाली आहे.

आपण जिवंत आहोत, तोवर... -याच वर्षाच्या सुरुवातीला हिमंता बिस्वा सरमा यांच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, 1935 रद्द केला. यावरून आसाम विधानसभेत मोठा गदारोळही झाला होता. तेव्हा, याची गरज काय, असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता? यावर, मुख्यमंत्री हिमंता संतप्तपणे म्हणाले होते की, आपण बालविवाहावर बंदी घालणारच. एवढेच नाही, तर आपण जिवंत आहोत, तोवर आसाममध्ये बालविवाह होऊ देणार नाही, असेही सरमा यांनी म्हटले होते.

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाmarriageलग्न