जगन्नाथ रथ यात्रेआधी पुरीत 41 तासांचे शटडाऊन; सर्व एंट्री पॉईंट्स बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 09:46 PM2020-06-22T21:46:31+5:302020-06-22T21:57:47+5:30

सर्व एंट्री पॉईंट बंद राहतील आणि याठिकाणी जाण्यावरही पूर्णपणे बंदी असणार आहे. हे शटडाऊन सुमारे 41 तास असेल.

41-hour shutdown in Puri before Jagannath Rath Yatra; All entry points closed | जगन्नाथ रथ यात्रेआधी पुरीत 41 तासांचे शटडाऊन; सर्व एंट्री पॉईंट्स बंद

जगन्नाथ रथ यात्रेआधी पुरीत 41 तासांचे शटडाऊन; सर्व एंट्री पॉईंट्स बंद

Next
ठळक मुद्देतीन रथ ओढण्यासाठी प्रति रथात 500 पेक्षा जास्त भाविक नसावेत. रथांमधे पुरेसे अंतर ठेवले पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

नवी दिल्ली : भगवान जगन्नाथ रथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री 9 ते दुपारी 2 या वेळेत पुरीमध्ये शटडाऊन असणार आहे. सर्व एंट्री पॉईंट बंद राहतील आणि याठिकाणी जाण्यावरही पूर्णपणे बंदी असणार आहे. हे शटडाऊन सुमारे 41 तास असेल.

ओडिशाचे मुख्य सचिव असित त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, 'रथ यात्रेदरम्यान कोरोनाच्या दृष्टीने कर्फ्यूसारखे निर्बंध लावले जातील.'

दुसरीकडे, पुरी येथे रथयात्रेपूर्वी विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस अड्डे, महामार्ग यासह शहरातील सर्व प्रवेशमार्ग बंद केले जावेत. तीन रथ ओढण्यासाठी प्रति रथात 500 पेक्षा जास्त भाविक नसावेत. रथांमधे पुरेसे अंतर ठेवले पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

याचबरोबर, रथ यात्रेदरम्यान पारंपारिक विधीमध्ये फक्त आवश्यक लोकांना परवानगी दिली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यामध्ये मंदिर समितीचे पंडे, अधिकारी व पोलिसांचा समावेश आहे. कोर्टाने यांना सामील होण्याचीही अटही  ठेवली आहे. यामध्ये रथयात्रेत सामील होईल, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह पाहिजे, असे कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाने पुरी येथील जगन्नाथाची रथयात्रा आयोजित करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. रथयात्रेबाबत आज सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिकेवर सुनावणी झाली. तेव्हा केंद्र सरकारने आपली भूमिका मांडताना रथयात्रेस परवानगी द्यावी अशी विनंती केली होती.

अखेरीस सर्व पक्षांचे म्हणणे विचारात घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी जगन्नाथ यात्रेस परवानगी दिली. मात्र जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन मंदिर समिती, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आरोग्याच्या मुद्याशी कुठलीही तडजोड न करता करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. 

आणखी बातम्या...

ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांनी पाहिले; मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडूनही घेणार सूचना

CoronaVirus News : धनंजय मुंडेंची कोरोनावर यशस्वी मात; योद्ध्यांचे हात जोडून मानले आभार!

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार जैसे थे!

ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा

"आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"

Web Title: 41-hour shutdown in Puri before Jagannath Rath Yatra; All entry points closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.