"आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 07:16 PM2020-06-21T19:16:49+5:302020-06-21T21:45:12+5:30

चीनला धडा शिकविण्यासाठी आणि भारत-चीन संघर्षात आपल्या शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील अलिगड येथील काही लहान मुलांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली होती.

Cops Stop 10 Kids Running On The Road, They Were On Their Way To China To 'Avenge' Our Martyrs | "आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"

"आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"

Next
ठळक मुद्देभारतात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तूंवर सुद्धा बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला. पण, या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. तसेच, भारतात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तूंवर सुद्धा बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. 

विशेष म्हणजे, चीनला धडा शिकविण्यासाठी आणि भारत-चीन संघर्षात आपल्या शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील अलिगड येथील काही लहान मुलांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. ही मुलं आपले घर सोडून सीमेवर जाण्यासाठी धावत निघाली होती. मात्र, या मुलांना उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर रोखले आणि त्यांची चौकशी केली. त्यावेळी आम्ही भारत-चीन सीमेवर जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या मुलांचे देशप्रेम पाहून पोलिसांनी त्यांचे कौतुक केले. मात्र, या मुलांना योग्यरित्या पोलिसांनी समजावले आणि पुन्हा आपल्या घरी पाठविले. या मुलांचा यासंदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

दरम्यान, गेल्या 15 जून रोजी लखाडच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. तर  चीनचे 43 हून सैनिक मारले गेले. यानंतर सीमेवरील तणाव वाढल्याचे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर हवाई दल आणि नौदलाचे जवान सुद्धा हाय अलर्टवर आहेत. चीनने सुद्धा सीमेवर आपल्या सैनिकांची तैनात वाढली आहे. तर दुसरीकडे, भारत-चीन सीमेवरील वाद सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, परंतु अद्याप सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे.

आणखी बातम्या...

धक्कादायक! पतीकडून पत्नीची डोक्यात कुकर घालून हत्या, परिसरात खळबळ

Google मुळे 40 वर्षांनंतर 93 वर्षीय आजी आपल्या कुटुंबीयांना भेटली!

राखी सावंतचा दावा; स्वप्नात आला सुशांत सिंग राजपूत अन् म्हणाला, 'तुझ्या पोटी घेईन पुनर्जन्म!'

नवी मुंबईत 12 इंच व्यासाच्या खगोलशास्त्रीय दुर्बिणीमधून पाहिले सूर्यग्रहण

दारूच्या नशेत तरूणाकडून आपल्या सहकाऱ्याची हत्या

Web Title: Cops Stop 10 Kids Running On The Road, They Were On Their Way To China To 'Avenge' Our Martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.