शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

म्हैसूरमधल्या शाही घराण्याची 400 वर्षांनी 'शापा'तून मुक्तता, कुटुंबाला मिळाला वारस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 9:54 PM

म्हैसूर : वाडियार या शाही कुटुंबाला 400 वर्षांनी वारस मिळाला आहे. राजपुत्राच्या जन्मामुळे राजघराण्यात आनंद साजरा केला जातोय.

म्हैसूर : वाडियार या शाही कुटुंबाला 400 वर्षांनी वारस मिळाला आहे. राजपुत्राच्या जन्मामुळे राजघराण्यात आनंद साजरा केला जातोय. म्हैसूर राजघराण्यातील वाडियार कुटुंबात कधीही मुलाचा जन्म होणार नाही, असा त्यांना शाप मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या शापातून मुक्तता झाल्याची भावना वाडियार कुटुंबीयांमध्ये आहे. राजा यदूवीर आणि त्रिशिका यांच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला आहे. आतापर्यंत वाडियार राजघराण्याचा वारस हा दत्तक घेतला जात होता. राणी प्रमोदा आणि राजा श्रीकांतदत्ता यांना मूल नसल्यामुळे त्यांनी राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना दत्तक घेतलं होतं. गेल्या वर्षी राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांचा विवाह राजस्थानमधील डुंगपूरच्या राजकुमारी त्रिशिकासोबत झाला होता. राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनी बोस्टनमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. तर त्रिशिका यांनी अमेरिकेतून उच्चशिक्षणाची पदवी संपादन केली आहे. काय आहे शाप ?1612मध्ये युद्धात विजयनगर साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर म्हैसूर राजघराण्याच्या सैनिकांनी विजयनगर साम्राज्याचा खजिना लुटला. त्यानंतरही राणी अलमेलम्माजवळ असलेले शाही घराण्याचे दागदागिनेही वाडियार राजांनी वाडियार घराण्याला देण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी राणी अलमेलम्मा यांनी त्यास नकार दर्शवला. त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला असता, त्यांनी वाडियार राजघराण्याला शाप दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. या शापामुळेच वाडियार घराण्यात आजमितीस पुत्र जन्माला आला नाही, असंही बोललं जातं. परंतु आता हे घराणं शापमुक्त झाल्याची भावना राजघराण्यातील माणसं व्यक्त करत आहेत.