४०० शेतकऱ्यांची आत्महत्या
By Admin | Updated: September 3, 2015 00:44 IST2015-09-03T00:44:28+5:302015-09-03T00:44:28+5:30
कर्नाटकात यावर्षी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४०० वर पोहोचली आहे. या आत्महत्यांमागे पिकांचे नुकसान, दुष्काळ आणि

४०० शेतकऱ्यांची आत्महत्या
नवी दिल्ली : कर्नाटकात यावर्षी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४०० वर पोहोचली आहे.
या आत्महत्यांमागे पिकांचे नुकसान, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणा ही तीन महत्त्वाची कारणे आहेत. राज्यात १७६ तालुक्यांपैकी १३५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये कर्जाची परतफेड करू न शकल्याने हे टोकाचे पाऊल उचलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पोलिसांनी गरीब शेतकऱ्यांना कर्ज देऊन नंतर वसुलीसाठी ससेमिरा लावणाऱ्या राज्यातील १००० सावकारांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. (वृत्तसंस्था)