शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

४० मिनिटांचा थरार; रोप-वे ट्रॉलीत हवेतच लटकले २८ भाविक, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 6:14 AM

देवघर दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; व्हिडीओ व्हायरल

सतना : मध्य प्रदेशातील सतना येथे सोमवारी एक मोठी दुर्घटना टळली. मैहर टेकडीवरील मां शारदादेवी मंदिरात दर्शनासाठी गेलेले सुमारे २८ भाविक रोप-वेच्या ट्रॉलीवरून प्रवास करत असताना हवेतच अडकले. अचानक मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने सात केबल कार किंवा ट्रॉली हवेतच लटकल्या होत्या. रोप-वे व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे भाविकांचा जीव कोंडीत सापडला होता. एका ट्रॉलीत चार जणांना बसण्याची परवानगी असते, त्यानुसार सात ट्रॉलीमध्ये २८ भाविक होते आणि हे सर्व तब्बल ४० मिनिटे हवेत लटकले होते. 

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतरही व्यवस्थापनाने रोप-वे सुरू ठेवला होता असे समजतेय. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असते. त्यावेळी रोप-वे बंद ठेवले जातात. ४० मिनिटांनंतर दामोदर रोप-वे व्यवस्थापनाने कशातरी हळूहळू ट्रॉली खाली आणल्या आणि भाविकांना सुरक्षित उतरवले. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. पण, घटनेमुळे सर्व भाविक प्रचंड घाबरले होते. रोप-वेचे काम थांबविण्याबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याचा आरोप अडकलेल्या भाविकांनी रोप-वे व्यवस्थापनावर केला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.  या घटनेने झारखंडमधील देवघर येथे नुकत्याच झालेल्या रोप-वे अपघाताची आठवण करून दिली. या अपघातात, दोन केबल-कार्सची समोरासमोर टक्कर होऊन  पाच जणांचा मृत्यू, तर ३०हून अधिक जखमी झाले होते. पर्यटक सुमारे ४० तास अडकले होते. भारतीय हवाई दल, लष्कर आणि एनडीआरएफने हे बचाव कार्य केले होते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश