शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

...म्हणून 4 वर्षांच्या चिमुकल्यानं गाठलं पोलीस स्टेशन, तक्रार ऐकून पोलीसही झाले चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 1:21 PM

Chandigarh News : 4 वर्षांच्या चिमुकल्याने न घाबरता आपल्या तक्रारीसाठी थेट पोलीस स्टेशन गाठल्याची घटना समोर आली आहे. चिमुकल्याची तक्रार ऐकून पोलीसही चकीत झालेले पाहायला मिळाले.

नवी दिल्ली - देशभरात चोरीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अनेकदा लोक पोलिसांत तक्रार दाखल करायला घाबरतात. मात्र आता एका 4 वर्षांच्या चिमुकल्याने न घाबरता आपल्या तक्रारीसाठी थेट पोलीस स्टेशन गाठल्याची घटना समोर आली आहे. चिमुकल्याची तक्रार ऐकून पोलीसही चकीत झालेले पाहायला मिळाले. ध्रुव असं या मुलाचं नाव असून त्याच्या सायकलची घंटी चोरीला गेली आहे. घंटी चोरीला गेल्याचं लक्षात येताच ध्रुवने पोलिसांत धाव घेतली. 

मिळालेल्या माहितीनुसार, हल्का बस्सी पठाना येथील मुहल्ला पूरा येथे राहणार्‍या राजन वर्माच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या 4 वर्षाच्या मुलाच्या सायकलची घंटी कोणीतरी चोरली. ध्रुव जेव्हा घराबाहेर पडला तेव्हा त्याने आपली सायकल पाहिली. त्यावेळी सायकलला घंटी नसल्याचं लक्षात आलं. तो धावत घरात गेला आणि ही बाब त्याच्या आई-वडिलांना सांगितली. सायकलची घंटी चोरीला गेल्याने त्याने पालकांसोबत पोलिसांत जाण्यासाठी हट्ट धरला. 

 4 वर्षांच्या चिमुकल्यानं गाठलं पोलीस स्टेशन

सुरुवातीला ध्रुवला त्याच्या वडिलांनी खूप समजावलं. पण तो ऐकून घ्यायला तयार नव्हता. वडिलांनी अखेर त्याचं म्हणणं मान्य केलं आणि त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेले. पोलिसांनी ध्रुवचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याला चोर आणि सायकलची घंटी लवकर शोधून काढू असं आश्वासनही दिलं. वडिलांनी घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी देखील या 4 वर्षांच्या चिमुकल्याला त्याची सायकलची बेल शोधून देण्यात मदत करण्याचं आश्वासन दिलं.

चिमुकल्याचा पोलिसांवर असलेला विश्वास पाहून सर्वांनाच वाटलं आश्चर्य

पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ध्रुवला सायकलची घंटी दिली पण त्यांना अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा पोलिसांवर असलेला विश्वास पाहून आश्चर्य वाटलं. पोलिसांवर ध्रुवने दाखवलेला हा विश्वास हा नव्या पीढीसाठी खूप चांगला संदेश असल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली आहे. लहान मुलांमध्ये पोलिसांप्रति असलेला आदर आणि विश्वास पाहून सर्वच जण चकीत झाले. तसेच लहान मुलं किती सतर्क असू शकतात हे देखील पाहायला मिळालं आहे. अनेकांनी ध्रुवच्या हुशारीचं कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसIndiaभारत