१५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे जवान ऍक्शन मोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:48 AM2021-10-21T06:48:33+5:302021-10-21T06:49:07+5:30

जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी चकमकीत चार अतिरेक्यांना ठार मारले, तर एक जवान शहीद व दोन जवान जखमी झाले.

4 terrorists killed jawan martyred 2 injured in encounter | १५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे जवान ऍक्शन मोडमध्ये

१५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे जवान ऍक्शन मोडमध्ये

Next

- सुरेश एस. डुग्गर

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी चकमकीत चार अतिरेक्यांना ठार मारले, तर एक जवान शहीद व दोन जवान जखमी झाले. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील कारागिराची हत्या केलेल्या अतिरेक्याचा या ४ जणांत समावेश आहे.  पोलीस महानिरीक्षक (काश्मीर झोन) विजय कुमार म्हणाले की, ‘कारागिर सगीर अन्सारी याची १६ ऑक्टोबर रोजी हत्या केलेल्या अतिरेक्याचे नाव अदिल वाणी असून, तो द रेझिस्टन्स फ्रंटचा (टीआरएफ) जिल्हा कमांडर होता.’ शोपियान जिल्ह्यातील द्रगाड भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांचा शोध घेण्यात येत असताना अतिरेक्यांनी सुरू केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले गेले. त्यात लष्कर-ए-तोयबाशी संबंधित टीआरएफचे ४ जण ठार, तर ३ सुरक्षा दल कर्मचारी जखमी झाले. अदिल वाणी हा जुलै २०२० पासून सक्रिय होता. गेल्या २ आठवड्यात १५ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे, मारले गेलेले सगळे अतिरेकी हे नागरिकांच्या हत्यांत सहभागी होते, असे विजय कुमार म्हणाले. 

मारेकऱ्यांचा शोध
दुसऱ्या अतिरेक्याची ओळख अजून पटलेली नाही. आदिल वाणी याने लिट्टर, पुलवामात एका गरीब मजूराची हत्या केली होती. नागरिकांच्या हत्यांत हात असलेल्या अतिरेक्यांची ओळख पटली असून त्यांचा शोध घेतला जात आहे, असे ते म्हणाले.

Web Title: 4 terrorists killed jawan martyred 2 injured in encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app