शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ४ विरोधी पक्षांनी दिली मोदी सरकारला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 10:11 IST

सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन या सोहळ्याला हजेरी लावायला हवी. लोकशाही भावनेने मी आणि माझा पक्ष या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे असं मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. मात्र या सोहळ्यावरून बरेच राजकारण रंगत आहे. बहुतांश विरोधी पक्षांनी या वास्तूचे उद्धाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते करावे, पंतप्रधानांच्या हस्ते नाही असा सूर काढला आहे. अनेकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. परंतु असेही काही विरोधी पक्ष आहेत जे NDA चे भाग नसतानाही वास्तू उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 

या सोहळ्यासाठी पंजाबमधील राजकीय पक्ष अकाली दल सहभागी होणार आहे. त्याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा YSRCP पक्षही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यादेखील नवीन संसद भवनाच्या वास्तू उद्घाटन सोहळ्याला हजर राहतील. 

YSR काँग्रेसकडून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ट्विट करून सांगितले की, भव्य आणि विशाल संसद भवन राष्ट्राला समर्पित करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. संसद हे लोकशाहीचे मंदिर असल्याने आपल्या देशाचं प्रतिबंब करते. ही वास्तू देशातील प्रत्येक नागरिकाची आणि प्रत्येक राजकीय पक्षाची आहे. अशा वास्तूच्या उद्धाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे लोकशाहीच्या भावनेला अनुसरून नसणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन या सोहळ्याला हजेरी लावायला हवी. लोकशाही भावनेने मी आणि माझा पक्ष या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे असं त्यांनी म्हटलं. 

'या' राजकीय पक्षांनी टाकला बहिष्कारआतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, NCP, सीपीआय(एम) यांचा समावेश आहे. ), RJD, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK).

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस