चार महिन्यांत २५ लाख लोकांना मिळाला रोजगार; नोकऱ्या गेल्याने अनेक लोक वळले शेतीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:26 AM2019-10-31T02:26:36+5:302019-10-31T06:17:18+5:30

याचा अर्थ या काळात यंदा २५ लाख लोकांना रोजगार मिळाला, असा लावला जात आहे. मात्र हे सारे रोजगार कमी कौशल्याचे आहेत, असे सीएमआयईने म्हटले आहे.

4 lakh people got employment in four months; With the loss of jobs, many people turned to agriculture | चार महिन्यांत २५ लाख लोकांना मिळाला रोजगार; नोकऱ्या गेल्याने अनेक लोक वळले शेतीकडे

चार महिन्यांत २५ लाख लोकांना मिळाला रोजगार; नोकऱ्या गेल्याने अनेक लोक वळले शेतीकडे

Next

नवी दिल्ली : यावर्षीच्या मे ते आॅगस्ट या काळात २५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला व या काळात देशात नोकरी करणाऱ्यांची एकूण संख्या ४0 कोटी ४९ लाखांच्या आसपास होती, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. गेल्या वर्षी याच काळात ४0 कोटी २४ लाख लोक नोकरीमध्ये होते.

याचा अर्थ या काळात यंदा २५ लाख लोकांना रोजगार मिळाला, असा लावला जात आहे. मात्र हे सारे रोजगार कमी कौशल्याचे आहेत, असे सीएमआयईने म्हटले आहे. या संस्थेने म्हटले की, या २५ लाख रोजगारांमुळे आनंद वाटावा, असे मात्र नाही. कारण कमी कौशल्य असणाºयांनाच तो उपलब्ध झाला. या अहवालानुसार उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान (आयटी) व आर्थिक सेवा (फायनान्शिअल सर्व्हिसेस) यांतील रोजगारही कमी झाले आहेत. दुसरीकडे शेती क्षेत्रात अधिक रोजगार मिळाले. शेतीबरोबरच किरकोळ व्यापार (रिटेल ट्रेड), वैयक्तिक स्वरूपाची मोलमजुरीची कामे, (पर्सनल नॉन प्रोफेशनल सर्व्हिसेस) आणि बांधकाम या चार क्षेत्रांत ७0 टक्के लोक कमी कौशल्याचे काम करीत होते.

इथे कमी झाल्या नोकऱ्या
या सर्व्हेनुसार गेल्या वर्षभरात देशातील उत्पादन क्षेत्रातील ९ लाख रोजगार कमी झाले. वस्त्रोद्योगात तब्बल २२ लाख रोजगार कमी झाले.
बांधकामाशी संबंधित सिमेंट, टाइल्स, विटा या उद्योगांतील ४ लाख रोजगार कमी झाले. संघटित उद्योगांतील रोजगार गेल्यामुळे अकुशल वा कमी कौशल्य असलेल्या लोकांना पुन्हा शेतीकडे वळावे लागले.

Web Title: 4 lakh people got employment in four months; With the loss of jobs, many people turned to agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.