शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली 4 लाखांची रक्कम अन् दागिने आगीत जळून खाक, तरुणी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 16:26 IST

बिहारच्या गया येथे घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

नवी दिल्ली : बिहारच्या गया जिल्ह्यातील टिकारी पोलीस स्टेशन हद्दीतील नारायण विघा येथील एका घरात शनिवारी संध्याकाळी गॅस सिलिंडर लिक झाल्यामुळे भीषण आग लागली. या अपघातात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. याशिवाय घरात ठेवलेले साडेचार लाख रुपये, अर्धा किलो चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने, धान्य, फर्निचर व घरात ठेवलेले इतर सर्व सामान जळून खाक झाले.

दरम्यान, आगीत जळून खाक झालेली सर्व संपत्ती जमीन विकून मुलीच्या लग्नासाठी व घर बांधण्यासाठी जमा करून ठेवली होती. या घटनेत तरूणी पुष्पा कुमारी ही गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

विघा गावातील ग्रामस्थ आशिष कुमार यांच्या मुलीचे लग्न होणार असल्याचे सांगितले जात आहे. घरात पैसे, दागिने व इतर लग्नाचे साहित्य ठेवले होते. स्वयंपाक करताना गॅस सिलिंडर लिक झाल्यामुळे शनिवारी रात्री घरात आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण घराला वेढले आणि मोठे आर्थिक नुकसान केले. 

आगीत मोठे नुकसानघरातील लोकांनी आपला जीव वाचवला. सिलिंडरचा स्फोट होण्याची भीती असल्याने आग आटोक्यात आणण्याचे धाडस कोणीच केले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत संपूर्ण घराला आग लागली आणि सर्व सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक परिश्रमाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.  

चार लाख रुपये प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवले होतेया घटनेत घरातील 10 क्विंटल तांदूळ, 3 क्विंटल गहू, 1 क्विंटल डाळी आणि घरातील सर्व फर्निचर जळून खाक झाल्याचे पीडित आशिष कुमार यांनी सांगितले. तसेच बहिणीच्या लग्नासाठी आणि घराच्या बांधकामासाठी जमा केलेले साडेचार लाख रुपयेही जळून खाक झाले. खरं तर आशिष यांनी पैसे प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवले होते. या घटनेची माहिती पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :BiharबिहारfireआगFire Brigadeअग्निशमन दल