शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांच्या 'त्या' 4 भविष्यवाणी, ज्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या; विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले...
2
शपथ घेताच मोदी ३.० सरकार ॲक्शन मोडमध्ये, नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; काय असेल मोठा निर्णय?
3
आजचे राशीभविष्य, १० जून २०२४ : नोकरीत आर्थिक लाभ होईल, मान - सन्मान वाढेल
4
भारताचा रोमांचक विजय! सामन्यात झाले असे ५ रेकॉड्स, ज्यामुळे पाकिस्तानची झाली 'बोलती बंद'
5
सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; Opening Bell मध्ये Power Grid मध्ये तेजी, एनएमडीसी घसरला
6
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : भारताचा अविश्वसनीय विजय, पाकिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला; शेजाऱ्यांचे स्पर्धेतून पॅकअप?
7
सेकंदाचे ४ लाख! India Vs. Pakistan टी २० वर्ल्ड कप दरम्यान बक्कळ कमाई, टॉप स्पॉन्सर कोण?
8
विशेष लेख: स्थिर सरकार, मजबूत विरोधी पक्ष; पण-परंतु!
9
Narendra Modi Net Worth: ना शेअर्स, ना म्युचुअल फंड्स; ना कार आणि जमीन; तिसऱ्यांदा पीएम बनणाऱ्या मोदींची संपत्ती किती?
10
आमच्या नोकऱ्यांचे काय? दोन वर्षांपूर्वीच झाली ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा
11
कोकणने महायुतीला यश दिले; पण मंत्रिपदाने दिली हुलकावणी, विदर्भात फटका तरी दोघे झाले मंत्री
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील हे आहेत सहा शिलेदार
13
२४ तासांत फाइल क्लीअर करा, दबावाला बळी पडू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या नव्या मंत्र्यांना सूचना
14
अनुभवी नेत्यांवर विश्वास; नव्या चेहऱ्यांनाही संधी, आगामी काळात निवडणूक असलेल्या राज्यांना प्रतिनिधित्व
15
लोकसभेत कोणत्या समाजाचे सर्वाधिक खासदार? एनडीए विरुद्ध इंडियाचा लेखाजोखा
16
ठाकरे राहतात तेथे मविआ पिछाडीवर, भाजप उमेदवाराला जास्त मते
17
Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ तयार; पाहा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातून कोणी घेतली शपथ?
18
मरिन ड्राइव्हवरून वरळी गाठा अवघ्या दहा मिनिटांत!, कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून सुरू
19
भारताने घेतले ७२२ कोटींचे सोने, मे महिन्यात स्वित्झर्लंड, चीनकडून सर्वाधिक खरेदी
20
Kolhapur: टीम इंडियाचा पाकिस्तानवर थरारक विजय, कोल्हापुरात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी   

३७ प्रादेशिक पक्षांकडे तब्बल ३,००० कोटी रुपयांची संपत्ती; मनसेकडे सर्वात कमी भांडवल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 10:03 AM

‘एडीआर’च्या अहवालातील निष्कर्ष, ४८.८८ टक्क्यांनी झाली वाढ

नवी दिल्ली : २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ४४ प्रादेशिक पक्षांकडे २२४९.२५ कोटी रुपयांची मालमत्ता होती तर २०२१-२०२२ या वर्षात ३७ प्रादेशिक पक्षांकडे ३०००.६२ कोटी रुपयांची मालमत्ता होती. ही माहिती या पक्षांनी निवडणूक आयोगाला कळविली होती, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

या अहवालात म्हटले आहे की, २०२०-२१ या आर्थिक वर्षात १० प्रादेशिक पक्षांकडे १९५९.३५१ कोटी रुपयांची असलेली मालमत्ता २०२१-२२ या वर्षात २९०९.१८६ कोटी रुपये झाली. म्हणजे या संपत्तीत ४८.४८ टक्क्यांनी वाढ झाली. २०२०-२१ या कालावधीत समाजवादी पक्षाकडे सर्वाधिक ५६१.४६ कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यात १.२३ टक्क्यांनी वाढ होऊन ती २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५६८.३६९ कोटी रुपये झाली. तर भारत राष्ट्र समितीची संपत्ती २०२०-२१मध्ये ३१९.५५ कोटी रुपये व २०२१ व २०२२मध्ये ५१२.२४ कोटी रुपये इतकी झाली. 

बिजद, जद (यू)च्या मालमत्तेत लक्षणीय वाढ२०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत द्रमुक, बिजद, जद(यू) या पक्षांची मालमत्ता ९५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात वाढली. त्यात द्रमुकची २४४.८८ टक्के, बिजदची १४३.९२ टक्के, जद (यू)ची ९५.७८ टक्क्यांनी मालमत्ता वाढली. आपची एकूण मालमत्ता २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षात ७१.७६ टक्क्यांनी वाढली. २०२०-२१मध्ये २१.८२ कोटी रुपये असलेली मालमत्ता २०२१-२२मध्ये ३७.४७७ कोटी रुपये झाली. 

२०२१-२२मध्ये पक्षांवर ७४ कोटी रुपयांचे कर्ज    २०२०-२१ या वर्षात प्रादेशिक पक्षांनी आपल्यावर ५४.०६३५ कोटींचे तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३७ प्रादेशिक पक्षांनी ७४.१८७३ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे आयोगाला कळविले आहे. १० प्रादेशिक पक्षांच्या २०२०-२१मध्ये कर्जाच्या रकमेत २०२१-२२मध्ये ४२.४१ टक्के वाढ होऊन ती ७२.६१८ कोटी झाली आहे. २०२१-२२मध्ये तेलुगु देसम पार्टीवर सर्वाधिक म्हणजे ४२.५८४ कोटी रुपयांचे कर्ज होते. 

२०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत बिजद व आपवर कर्जांमध्ये अनुक्रमे १४८१.४० टक्के व २२२.५० टक्के वाढ झाली. जनता दल (एस) व एजेएसयूवरील कर्जांमध्ये अनुक्रमे ८.२९ व ८.३३ टक्के वाढ झाली.

द्रमुक, तेलुगु देसमच्या संपत्तीत झाली घटपहिल्या दहा प्रादेशिक पक्षांमधील द्रमुक व तेलुगु देसम पार्टी या पक्षांच्या संपत्तीत अनुक्रमे १.५५ टक्के व ३.०४ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये अण्णा द्रमुक या प्रादेशिक पक्षाच्या मालमत्तेत २६०.१६६ कोटी रुपयांवरून २५६.१३ कोटी रुपये तर तेलुगु देसम पार्टीच्या मालमत्तेत १३३.४२३ कोटी रुपयांवरून १२९.३७२ कोटी रुपयांपर्यंत घट झाल्याचे दिसून येत आहे.

मनसेकडे १५ कोटी रुपयांचे भांडवल२०२१-२२ मध्ये समाजवादी पक्षाने ५६८.०३७ कोटी रुपयांचे सर्वाधिक भांडवल (कॅपिटल) घोषित केले. भारत राष्ट्र समितीने ५०२.५५१ कोटी तर बिजद ४७३.०६ कोटींचे भांडवल घोषित केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वांत कमी म्हणजे १५.८२४ कोटींचे भांडवल असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :MNSमनसे