शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! 352 वर्ष वयाचा माणूस; दरवर्षी बजावतो मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 13:35 IST

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील मतदारयाद्यांचा अभ्यास नुकताच करण्यात आला

विजयवाडा: महाभारतातल्या अश्वत्थामाबद्दल तुम्ही नक्कीच वाचलं किंवा ऐकलं असेल. अश्वत्थामा आजही जिवंत आहे, तो त्याच्या भळभळत्या जखमांसह डोंगर दऱ्यातून भटकतो, असं म्हटलं जातं. यात काही तथ्य असण्याची शक्यता नाही. मात्र आंध्र प्रदेशात एक 352 वर्षांची व्यक्ती राहते. विशेष म्हणजे ही व्यक्ती प्रत्येक निवडणुकीत न चुकीत मतदानही करते. एखादी व्यक्ती तब्बल 352 वर्षे कशी काय जगू शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या व्यक्तीच्या दीर्घायुष्याचं गुपित मतदारयाद्यांमधल्या गोंधळात दडलं आहे.आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील मतदारयाद्यांचा अभ्यास नुकताच करण्यात आला. त्यातून अनेक गोंधळ समोर आले आहेत. जिल्ह्यात एक 352 वर्षाची व्यक्ती राहत असून ती दरवर्षी मतदान करते, अशी अजब माहिती मतदारयाद्यांमधील गोंधळातून पुढे आली आहे. यासोबतच असे अनेक गोंधळात टाकणारे आकडे अभ्यासातून समोर आले आहेत. आयआयएम बंगळुरुचा माजी विद्यार्थी आणि सॉफ्टवेअर अभियंता थुम्माला लोकेश्वर रेड्डीच्या टीमनं ही भंडावून सोडणारी माहिती शोधून काढली आहे. मतदारयाद्यांमधील 15 टक्के मतदार बोगस आणि अवैध असल्याची माहिती रेड्डी आणि त्यांच्या टीमनं पुढे आणली आहे. मतदारयादीत अनेकांची नावं वारंवार आली आहेत. हे बोगस मतदार एखाद्या मतदारसंघाचा निकाल फिरवू शकतात. आंध्र प्रदेशातील मतदारांची संख्या 3.2 कोटी इतकी आहे. यातील 52.57 लाख मतदार बोगस असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. तर 25 लाख मतदारांची नावं योग्य असली, तरी मतदारयादीतील त्यांची इतर माहिती चुकीची आहे. दोन-दोन मतदार ओळखपत्रं बाळगणाऱ्या लोकांची संख्यादेखील हजारोंच्या घरात आहे.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशElectionनिवडणूक