गुजरात पोलिस दलात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण - आनंदीबेन पटेल यांची घोषणा

By Admin | Updated: June 24, 2014 14:58 IST2014-06-24T14:57:38+5:302014-06-24T14:58:17+5:30

गुजरातमधील पोलिस दलात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केली आहे.

33 percent reservation for women in Gujarat police force - Anandiben Patel's announcement | गुजरात पोलिस दलात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण - आनंदीबेन पटेल यांची घोषणा

गुजरात पोलिस दलात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण - आनंदीबेन पटेल यांची घोषणा

ऑनलाइन टीम
गांधीनगर, दि. २४ - गुजरातमधील पोलिस दलात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केली आहे. या घोषणेमुळे महिलांना आरक्षण देणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे.
महिलांच्या सबलीकरणासाठी गुजरात सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे, आनंदीबेन पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले. नवीन पोलिस अधिका-यांच्या कवायतीच्या कार्यक्रमानंतर बोलताना आनंदीबेन यांनी ही घोषणा केली. गुजरात पोलिस दलात ९७ फौजदारासंह गुप्तहेर खात्यातील ३९ पोलिस अधिका-यांनी पदाची शपथ घेतली.  
 

 

Web Title: 33 percent reservation for women in Gujarat police force - Anandiben Patel's announcement