शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 10:55 IST

गेल्या चार वर्षांत 19 लढाऊ विमानं अपघातग्रस्त

नवी दिल्ली: हवाई दलाच्या विमानांचे वारंवार होणारे अपघात भारताच्या दृष्टीनं चिंतेचा विषय झाला आहे. 2015-16 पासून भारतीय हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त झाली आहेत. यामध्ये 19 लढाऊ विमानांचा समावेश आहे, अशी आकडेवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. रशियाकडून खरेदी करण्यात आलेलं एएन-32 विमान काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालं. त्याचीही माहिती राजनाथ यांनी सभागृहाला दिली. हवाई दलाच्या एएन-32 विमानाला 3 जून रोजी अपघात झाला. यामध्ये हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर एएन-32 विमानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र एएन-32 विमानं अतिशय उपयुक्त असून ती यापुढेही हवाई दलाच्या सेवेत असतील, असं राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी 2015-16 पासून झालेल्या अपघातांचीही माहिती दिली. 2015-16 या वर्षात हवाई दलाची चार लढाऊ विमानं आणि प्रत्येकी एक हेलिकॉप्टर, वाहतूक विमान आणि प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळलं, असं राजनाथ यांनी सांगितलं. 

2016-17 या आर्थिक वर्षात हवाई दलाची सहा लढाऊ विमानं, दोन हेलिकॉप्टर आणि प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं एक विमान कोसळल्याची आकडेवारी सिंह यांनी दिली. तर 2017-18 मध्ये हवाई दलानं दोन लढाऊ विमानं आणि प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी तीन विमानं गमावल्याचंही सिंह म्हणाले. 2018-19 मध्ये हा आकडा आणखी वाढला. या वर्षात हवाई दलाची सात लढाऊ विमानं, दोन हेलिकॉप्टर्स आणि प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी दोन विमानं अपघातग्रस्त झाली. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या मिग-21 या विमानाचाही समावेश आहे. 
अभिनंदन यांचं मिग-21 विमान 27 फेब्रुवारीला कोसळलं. त्याच दिवशी एमआय-17 हेलिकॉप्टरदेखील दुर्घटनाग्रस्त झालं. त्यामध्ये हवाई दलाच्या सहा जणांचा मृत्यू झाला. 2019-20 या वर्षात आतापर्यंत एका विमानाचा अपघात झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एएन-32 विमानाचा अपघात झाला. त्यात 13 कर्मचारी मृत्यूमुखी पडले.   

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAccidentअपघातAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान