शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

26/11 सारखा हल्ला रोखण्यासाठी कोस्ट गार्डसाठी 32 हजार कोटींचा प्लान मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 11:59 IST

भारताच्या सागरी सुरक्षेत महत्वाची भूमिका असलेल्या तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने 31,748 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

ठळक मुद्दे08 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तटरक्षक दलाची भूमिका अत्यंत महत्वाची बनली आहे.नव्या गस्ती नौका, बोटी, हॅलिकॉप्टर, विमाने आणि अन्य आवश्यक उपकरणे विकत घेण्यात येतील.

नवी दिल्ली, दि. 16 -  भारताच्या सागरी सुरक्षेत महत्वाची भूमिका असलेल्या तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने 31,748 कोटी रुपये मंजूर केले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पुढच्या पाचवर्षात तटरक्षक दलाला अधिक बलवान आणि सशक्त करण्याच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानंतर तटरक्षक दल सर्वात छोटे सशस्त्र सैन्यदल आहे. 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तटरक्षक दलाची भूमिका अत्यंत महत्वाची बनली आहे. कारण त्यावेळी पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत आले होते. 

तटरक्षक दलाची टेहळणी क्षमता वाढविण्यासाठी नव्या गस्ती नौका, बोटी, हॅलिकॉप्टर, विमाने आणि अन्य आवश्यक उपकरणे विकत घेण्यात येतील. तटरक्षक दलासाठी पुढच्या पाचवर्षांचा कृती आराखडा ठरवण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण सचिव संजय मित्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तटरक्षक दलासाठीच्या खरेदी व्यवहारांना मंजुरी देण्यात आली. 

समुद्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तटरक्षक दलाच्या ताफ्यात 2022 पर्यंत 175 बोटी, 110 विमानांचा समावेश करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. समुद्र संपत्तीचे संरक्षण, समुद्र पर्यावरण,  प्रदूषण नियंत्रण ,तस्करी, समुद्री चाच्यांविरोधात कारवाई यांचा मुकाबला करण्यासाठी तटरक्षक दलाला पूर्णपणे सुसज्ज करण्याची योजना आहे.  भारताला 7,516 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून यामध्ये 1,382 बेटे आहेत.   

आणखी वाचा सैनिकांनो बंदुकी मोडा अन् काश्मिरींना मिठ्या मारा, सामनातून मोदींवर टीकानायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी

सध्या तटरक्षक दलाच्या 130 युनिटकडे 60 बोटी, 18 हॉव्हरक्राफ्ट, 52 छोटया इंटरसेप्ट बोटी, 39 डॉनियर टेहळणी विमाने, 19 चेतक हॅलिकॉप्टर, चार ध्रुव हॅलिकॉप्टर्स आहेत. 

वसईच्या किनारपट्टीवर ‘सागरी सुरक्षाकवच’वसई विरारच्या किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेसाठी समुद्रात गस्त वाढविण्यात आली असून सर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. याशिवाय सर्व लॅण्डींग पॉर्इंटसची नाकाबंदी करण्यात आली आहे.दहशतवादी हल्ला सागरी मार्गाने होण्याची शक्यता गृहीत धरून सागरी किनारपट्टीवर पालघर पोलिसांतर्फे सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते.  स्पीड बोटीने किनारपट्टीवर गस्त घालून संशयास्पद बोटींची तपासणी करण्यात आली.