सैनिकांनो बंदुकी मोडा अन् काश्मिरींना मिठ्या मारा, सामनातून मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 07:09 AM2017-08-16T07:09:21+5:302017-08-16T07:09:42+5:30

काश्मीरमध्ये उफाळून आलेला हिंसाचार, दहशतवाद मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला

pm modi on kashmir issue | सैनिकांनो बंदुकी मोडा अन् काश्मिरींना मिठ्या मारा, सामनातून मोदींवर टीका

सैनिकांनो बंदुकी मोडा अन् काश्मिरींना मिठ्या मारा, सामनातून मोदींवर टीका

मुंबई, दि. 16 - काश्मीरमध्ये उफाळून आलेला हिंसाचार, दहशतवाद मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल, असं म्हणत सामनाच्या संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे. ह्यना गोली से, ना गाली सेङ्घ समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!ह्णह्ण खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते, असं म्हणत शिवसेनेने मुखपत्र सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. आता हा विचार अमलात आणण्यासाठी एकच करा. काश्मिरमधील 370 कलम लगेच हटवून टाका. म्हणजे देशभरातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी काश्मिरात जातील व तेथील लोकांच्या गळाभेटी घेतील, असंही उपरोधिकपणे शिवसेनेनं म्हटलं आहे. सैनिकांनो, बंदुका मोडा व काश्मिरींना मिठ्या मारा, पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचे आम्ही स्वागत करीत आहोत!, असंही सामनातून छापून आलं आहे.
सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे
पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून अत्यंत ह्यसंयमीह्ण वगैरे पद्धतीने देशाला संदेश दिला आहे. नेहमीचे गुद्दे गायब व फक्त मुद्देच मुद्दे असे त्यांच्या भाषणाचे स्वरूप दिसते. आपला देश बुद्धांचा आहे, महात्मा गांधींचा आहे. आस्थेच्या नावावर सुरू असलेल्या हिंसेचे समर्थन करू शकत नसल्याचे मोदी यांनी सांगितले, पण त्यात नवीन काय? हे सर्व काही जुनेच आहे व असेच काही लाल किल्ल्यावरून बोलण्याची परंपरा आहे.
आस्थेच्या नावावर हिंसा कोण करीत आहे व त्यामागची कारणे काय आहेत? मावळलेले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मुसलमानांना देशात असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली. संघ विचारक लोकांनी अन्सारी यांना देश सोडण्याची धमकी दिली. हमीद अन्सारी यांनी व्यक्त केलेली भीती व मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आस्थेच्या नावावर हिंसाचार चालणार नसल्याची घेतलेली भूमिका यात सांगड दिसतेच आहे.
देशात हिंसाचार सुरूच आहे व तो श्रद्धा आणि आस्थेच्या नावावर सुरू असेल तर मुसलमानच काय, हिंदूंनाही असुरक्षित असल्याचे वाटू लागेल. भारतात जातीयवाद आणि धर्मांधतेला स्थान राहणार नसल्याची गर्जना पंतप्रधान महोदयांनी केली आहे. जातीयवादाचे विष देशाचे भले करू शकणार नाही हा विचार मोदी यांनी मांडला आहे.
आज सर्वच जाती आपापल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. मतांसाठी जाती-जातींना चुचकारण्याचे काम आजही वेगाने सुरू आहे. आर्थिक विषमता हेच जातीयवादाचे कारण आहे. ही विषमता पंतप्रधान कशी काय संपवणार?
हरियाणा, राजस्थानात जाट व महाराष्ट्रात ह्यमराठाह्ण समाज त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा आर्थिक व सामाजिक विषमतेची दाहकता समजून येते. गोरक्षणाच्या मुद्दय़ावर हिंदू समाजातील काही घटक हिंसक व धर्मांध झाले आहेत आणि त्यांना फक्त इशारे देऊन भागणार नाही.
लोकमान्य टिळकांचे फोटो गणेशोत्सवातून हटविण्याचे प्रकार जातीय भावनेतून सुरू झाले असतील तर ही श्रद्धा नसून एक प्रकारची विकृती आहे व राज्यातील मोदी यांच्या शिलेदारांनी ती मोडून काढली पाहिजे. मुंबईसारख्या शहरातील शाकाहार विरुद्ध मांसाहार हा वाद म्हणजे नव्या धर्मांधतेचा उदय आहे.
ह्यह्यवंदे मातरम्ह्ण म्हणणार नाही असे मस्तवालपणे म्हणणारे लोक देशात आहेत. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करताना जो कठोरपणा दाखवला तसा कठोरपणा 'वंदे मातरम्'च्या बाबतीत का दाखवला जात नाही? वंदे मातरमची सक्ती सहन करणार नाही असे म्हणणाऱ्या लोकांवर तुमचा धाक नाही किंवा या देशात चलता है ही मानसिकता अद्यापि मेलेली नाही.

पंतप्रधान म्हणतात, आम्ही देशाला नवीन ट्रकवर घेऊन जात आहोत.ह्णह्ण आम्ही त्यांचे स्वागत करतो. पण हा ट्रक फक्त अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचाच असू नये. नोटाबंदी निर्णयानंतर देशातील काळा पैसा बाहेर आला असेलही, पण आपला वायदा परदेशी बँकांत दडवलेला काळा पैसा बाहेर आणण्याचा होता व सर्व देशवासीयांच्या खात्यात किमान 14 ते 15 लाख रुपये जमा करण्याचा होता. पुढच्या दोन वर्षांत हा वायदा पुरा व्हावा ही लोकांची माफक अपेक्षा आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर करदात्यांची संख्या वाढली. 18 लाख नवे करदाते मिळाले, पण आतापर्यंत २० लाख लोक बेरोजगारही झाले आहेत हे लपवता येणार नाही. डोकलामपर्यंत चिनी सेना घुसली आहे व लेह-लडाखला आपला विरोध डावलून चिन्यांनी रस्ते व पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्या लाल माकडांना पंतप्रधानांनी इशारा दिला आहे, पण काश्मीरचा हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी आपण जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल.

Web Title: pm modi on kashmir issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.