शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

चार वर्षात ३00 रेल्वे अपघात!

By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST

मालमत्तेचे नुकसान - भरपाईपोटी प्रशासनाला ९४५.५३ कोटींचा भुर्दंड

मालमत्तेचे नुकसान - भरपाईपोटी प्रशासनाला ९४५.५३ कोटींचा भुर्दंड
अकोला : गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात सुमारे ३00 रेल्वे अपघात घडले आहेत. विविध कारणांमुळे घडलेल्या या अपघातांमध्ये मालमत्तेचे झालेले नुकसान आणि अपघातातील मृत व जखमींना द्यावी लागलेली नुकसानभरपाई, यामुळे भारतीय रेल्वेला या कालावधित ९४५.५३ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.
सन २0११-१२ ते २0१४-१४ या चार वर्षांमध्ये देशभरात घडलेल्या रेल्वे अपघातांची माहिती रेल्वे प्रशासनाने संकलित केली आहे. रेल्वे रुळावरून घसरल्याने झालेले अपघात, निकृष्ट स्लिपर्स आणि रुळांची निकृष्ट बांधणी (वेल्डिंग) या रेल्वे सुरक्षेला आव्हान देणार्‍या तीन प्रमुख कारणांमुळे घडलेल्या अपघातांची दखल या अहवालामध्ये घेण्यात आली आहे. याशिवाय नैसर्गिक कारणे आणि मानवी त्रुटी तसेच निकृष्ट झालेले रेल्वे पूल व रेल्वे उड्डाणपुलांमुळे घडलेल्या अपघातांचा यात प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. मानवरहित रेल्वे फाटकांवर आणि रेल्वे रूळ ओलांडताना घडलेल्या गंभीर अपघातांची नोंदही या सर्वेक्षणात घेण्यात आली आहे.
सन २0११-१२ मध्ये ७७ गंभीर स्वरूपाचे रेल्वे अपघात घडले. त्यात ११५ जण मृत्युमुखी पडले, तर ५७४ जण गंभीर जखमी झाले. प्रशासनाला नुकसानभरपाईपोटी १४५.९४ कोटी मोजावे लागले, तर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानापोटी १७४ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला.
सन २0१२-१३मध्ये ६९ गंभीर अपघात घडले. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ८१ जणांच्या कुटुंबियांना व ३00 जण गंभीर जखमींना रेल्वेला १७0.३५ कोटी नुकसानभरपाई द्यावी लागली. मालमत्तेच्या नुकसानीपोटी रेल्वेला १२९.१७ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला.
सन २0१३-१४मध्ये देशभरात ७१ रेल्वे अपघात घडले. त्यात मृत्युमुखी पडलेल्या ५४ जणांच्या कुटुंबियांना व ११९ गंभीर जखमींना ११.९३ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागली, तर ७४.४१ कोटींचा आर्थिक फटका मालमत्तेच्या नुकसानीपोटी रेल्वे प्रशासनाला सहन करावा लागला.
सन २0१४-१५मध्ये देशात ८0 गंभीर रेल्वे अपघात घडले. त्यात १२३ जण मृत्युमुखी पडले, तर ३३५ जण गंभीर जखमी झाले. या वर्षात रेल्वेला मृत आणि जखमींच्या नुकसानभरपाईपोटी १२३.११ कोटी मोजावे लागले, तर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानापोटी रेल्वेला ८१.९७ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.