नवी दिल्ली : देशात आतापर्यंत ३० कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली असण्याची शक्यता आहे असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या तिसºया सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.देशातील १.३५ अब्ज लोकसंख्येचा विचार केला तर दर चार लोकांमागे एका व्यक्तीला कोरोनाची बाधा होऊन गेली असण्याची शक्यता असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. देशात १ कोटी ७ लाख कोरोना रुग्ण नोंदविले गेले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा ३० कोटींपेक्षा अधिक असावा असेही या सर्वेक्षणात नमुद करण्यात आले आहे.आरोग्य सेवकांमध्ये कोरोनाच्या फैलावाचे प्रमाण २५ टक्के होते. त्यातील डॉक्टर, नर्सेसमध्ये कोरोना फैलावाचे प्रमाण २६.६ टक्के, आरोग्य क्षेत्रातील प्रशासकीय कर्मचाºयांमध्ये हे प्रमाण २४.९ टक्के होते. शहरी भागात अधिक धोकाआयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, दुस-या सिरो सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार शहरातील झोपडपट्ट्या, बिगरझोपडपट्ट्यांच्या भागात कोरोना फैलावाचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत दुप्पट होते. हा धोका अद्यापही कायम आहे.१७ डिसेंबर २०२० ते ७ जानेवारी २०२१ या कालावधीत तिसरे सिरो सर्वेक्षण १८ वर्षे वयावरील २१.४ टक्के लोकांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला होता. तो धोका अजूनही कायम आहे.
देशात ३० कोटी लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली असण्याची शक्यता, आयसीएमआरच्या तिसरा सिरो सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 14:26 IST